Ayesha Suicide Case Ahmedabad: 'शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावरच प्रेम...' आयशा आत्महत्या प्रकरणात पतीला 10 वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 03:51 PM2022-04-28T15:51:58+5:302022-04-28T15:52:12+5:30

Ayesha Suicide Case Ahmedabad: गेल्या वर्षी देशभरात गाजलेल्या अहमदाबादच्या आयशा आत्महत्या प्रकरणात पतीला 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Ayesha Suicide Case Ahmedabad | Accused husband sentenced 10 years jail | Ayesha Suicide Case Ahmedabad: 'शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावरच प्रेम...' आयशा आत्महत्या प्रकरणात पतीला 10 वर्षांची शिक्षा

Ayesha Suicide Case Ahmedabad: 'शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावरच प्रेम...' आयशा आत्महत्या प्रकरणात पतीला 10 वर्षांची शिक्षा

googlenewsNext

Ayesha Suicide Case Ahmedabad: देशभर गाजलेल्या गुजरातच्या आयशा आत्महत्या प्रकरणी कोर्टाने आरोपी पतीला शिक्षा सुनावली आहे. गेल्यावर्षी 23 वर्षीय आयशाने साबरमती नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ शूट करुन कुटुंबियांना पाठवला होता. हा व्हिडिओ केवळ गुजरातच नव्हे, तर देशभरात व्हायरल झाला होता. 

आरोपी पतीला 10 वर्षांची शिक्षा
आयशा आत्महत्या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद सत्र न्यायालयाने पती आरिफला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आयशाने 25 फेब्रुवारी 2021 रोजी साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर पती राजस्थानमध्ये पळून गेला होता. 1 मार्च रोजी त्याला पाली येथून अटक करण्यात आलो होती. त्याला आता न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

नेमकं काय झालं होतं?
मूळची राजस्थानची असलेली आयशा लग्नानंतर तिच्या पतीसोबत अहमदाबादच्या वाटवा येथे राहत होती. 23 वर्षीय आयशाचा विवाह 2018 मध्ये राजस्थानमधील जालोर येथील आरिफसोबत झाला होता. आरिफचे राजस्थानमधील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. आयशासमोर आरिफ प्रेयसीशी व्हिडिओ कॉलवर बोलत असे. यामुळे गरोदरपणात आरिफच्या वागण्याने आयशा तुटली होती. ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तिचे मूलही गर्भातच मरण पावले. दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असत. रोजच्या भांडणाला कंटाळून तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.

व्हिडिओ व्हायरल
साबरमती नदीत उडी मारण्यापूर्वी आयशाने एक व्हिडिओ आपल्या कुटुंबीयांना पाठवला होता. तो व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला. त्या व्हिडिओत आयशा म्हणाली होती, "आरीफ आय लव्ह यू. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहीन. ही सुंदर नदी तिच्या मला मिठीत घेईल, अशी मी प्रार्थना करते.'' आयेशाच्या मृत्यूनंतर हे प्रकरण हुंड्यासाठी छळाचे असल्याचे निष्पन्न झाले होते. 

Web Title: Ayesha Suicide Case Ahmedabad | Accused husband sentenced 10 years jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.