अयोध्येत खळबळ! एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या; १० वर्षाखालील ३ मुलांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 05:03 PM2021-05-23T17:03:42+5:302021-05-23T17:04:50+5:30

Murder Case : अयोध्येत एक धक्कादायक घटना घडली असून तेथे दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या तीन मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

In Ayodhya 5 members of the same family killed; Includes 3 children under 10 years | अयोध्येत खळबळ! एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या; १० वर्षाखालील ३ मुलांचा समावेश 

अयोध्येत खळबळ! एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या; १० वर्षाखालील ३ मुलांचा समावेश 

Next
ठळक मुद्देही बाब अयोध्या जिल्ह्यातील इनातनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खानपूर मजरे बरिया निसारूची आहे.

एकीकडे उत्तर प्रदेशसह संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. दुसरीकडे अयोध्येत एक धक्कादायक घटना घडली असून तेथे दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या तीन मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हे हत्याकांड कोणी घडवून आणले, हे पोलिसांना अद्याप कळलेले नाही.

ही बाब अयोध्या जिल्ह्यातील इनातनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खानपूर मजरे बरिया निसारूची आहे. जिथे एकाच कुटुंबातील ५ जणांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. यात पती-पत्नी आणि तीन मुले यांचा समावेश आहे. मृत दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. ही तीन मुले १० वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत.



या प्रकरणात, मालमत्तेच्या वादावरून या कुटुंबाची हत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. खून झाल्यापासून मारेकरी फरार झाले आहेत, अद्याप मारेकरी किती होते हे देखील कळालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच अयोध्येतील उच्च अधिकारी रवाना झाले आहेत.

Dagadi Chawl : 'डॅडी'च्या बालेकिल्ल्यात दडलंय काय?; लवकरच जमीनदोस्त होणाऱ्या 'दगडी चाळी'ची जबरदस्त गोष्ट


कोरोनामध्येही, खून आणि बलात्काराच्या घटना देशभरात वाढत आहेत. उत्तर प्रदेशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. आधीच जारी केलेल्या मंजुरी पुढील आठवड्यातही सुरू राहतील, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत औद्योगिक कारखाने पूर्वीप्रमाणे चालू राहतील. परंतु सर्वसामान्यांचे बाहेर पडणे पूर्वीसारखेच निर्बंधित राहील. या व्यतिरिक्त, आवश्यक त्या सेवेसाठी परवानगी दिली जाईल, जसे की लस घेणे, वैद्यकीय सेवा आणि औद्योगिक क्रियाकलाप यांशी संबंधित सेवांना परवानगी देण्यात आली आहे. 

शरद पवार, रोहित पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणं भोवलं, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव पोलिसांच्या ताब्यात

Web Title: In Ayodhya 5 members of the same family killed; Includes 3 children under 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.