'रोड रोलर' चालक इअरफोन लावून ऐकत होता गाणी अन् ती किंचाळत राहीली, १८ वर्षीय तरुणी चिरडली गेली!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 07:44 PM2022-03-22T19:44:07+5:302022-03-22T19:44:31+5:30

अयोध्येतील गिरधर गावाजवळ काळीज पीळवटून टाकणारी घटना घडली आहे. सध्या अयोध्या रायबरेली राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

ayodhya ear phone became a murderer know how 18 year old girl crushed under pressure roller | 'रोड रोलर' चालक इअरफोन लावून ऐकत होता गाणी अन् ती किंचाळत राहीली, १८ वर्षीय तरुणी चिरडली गेली!

'रोड रोलर' चालक इअरफोन लावून ऐकत होता गाणी अन् ती किंचाळत राहीली, १८ वर्षीय तरुणी चिरडली गेली!

Next

अयोध्या

अयोध्येतील गिरधर गावाजवळ काळीज पीळवटून टाकणारी घटना घडली आहे. सध्या अयोध्या रायबरेली राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यादरम्यान येथे काम करणाऱ्या १८ वर्षीय मजुराचा प्रेशर रोलरखाली येऊन चिरडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलगी प्रेशर रोलरच्या खाली कशी आली हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आणि त्यांनी ड्रायव्हरला शिव्यांची लाखोली वाहिली. मात्र, घटनेनंतर चालकानं घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान डंपरमधून टाकलेली माती प्रेशर रोलरने दाबली जात होती. प्रेशर रोलर चालवणारा तरुण कानाला इअरफोन लावून गाणी ऐकण्यात मग्न होता. प्रेशर रोलरच्या मागे काही मजूर महिला मातीतून लाकूड आणि गवत चाळत होत्या. अचानक चालकानं रोलर मागे घेतला. यामध्ये 18 वर्षीय मुलगी रोलरखाली दबली गेली. इतर मजुरांनी चालकाला थांबवण्यासाठी खूप आरडाओरडा केला आणि लोकांनीही आरडाओरडा केला पण कानात इअरफोन असल्यानं त्याला काही ऐकू गेलं नाही. गर्दी जमल्याचं पाहून आरोपी चालकानं तेथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तात्काळ रोलर काढून मुलीला रुग्णालयात नेलं, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आता प्रेशर रोलर ताब्यात घेतला असून आरोपीच्या शोधासाठी छापे टाकले जात आहेत. तसेच, तक्रार आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

Web Title: ayodhya ear phone became a murderer know how 18 year old girl crushed under pressure roller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.