आश्रमातील बाबावर महिलेचा रेपचा आरोप, म्हणाला - '108 दिवसात 21 वेळा माझ्यासोबत संबंध ठेवावे लागतील'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 13:14 IST2022-08-02T13:14:17+5:302022-08-02T13:14:39+5:30
Crime News : एका आश्रमातील बाबाने सांगितलं की, 108 दिवसात 21 वेळा माझ्यासोबत संबंध ठेवावे लागतील. असं केल्यावर तुझा काळदोष दूर होऊन तो माझ्यावर येईल.

आश्रमातील बाबावर महिलेचा रेपचा आरोप, म्हणाला - '108 दिवसात 21 वेळा माझ्यासोबत संबंध ठेवावे लागतील'
Crime News : भोंदू बाबांकडून महिलांचं लैंगिक शोषण केल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एका खळबळजनक घटना राजस्थानच्या जालौरमधून समोर आली आहे. इथे कालदोष दूर करण्याच्या बहाण्याने बाबा एका महिलेसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. आरोप आहे की, एका आश्रमातील बाबाने सांगितलं की, 108 दिवसात 21 वेळा माझ्यासोबत संबंध ठेवावे लागतील. असं केल्यावर तुझा काळदोष दूर होऊन तो माझ्यावर येईल.
'साध्वीने तोंडात कपडा कोंबला आणि रेपचा व्हिडीओ बनवला'
जेव्हा महिलेने बाबासोबत संबंध ठेवण्यास नकार दिला तेव्हा महिलेला फसवून आश्रमात बोलवण्यात आलं आणि तिच्यासोबत रेप करण्यात आला. यात आश्रमाची संचालिका हेमलता हिनेही आरोपीची साथ दिल्याचा आरोप आहे. पीडितेने आरोप केला आहे की, साध्वीने माझ्या तोंडात कपडा कोंबला होता आणि तिने रेपचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. आता ब्लॅकमेल करून परिवारासोबत जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. ही घटना 19 फेब्रुवारी 2022 ची आहे. यासंबंधी 27 जुलैला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अनैतिक संबंध ठेवून उपचार करण्याचा दावा
पोस्टाच्या माध्यमातून 27 जुलैला रात्री 10 वाजता एक तक्रार आली होती. ज्यात जोधपूर भागात कार्यरत एएनएमने आरोप केला होता की, तिचे पती व सासरचे लोक भक्तीसेवेत खूप विश्वास ठेवतात. ज्यामुळे तिचा पती मानव सेवा विश्व गुरू दत्तात्रेय आश्रममध्ये साध्वी हेमलता आणि तिचा सहयोगी तगारामजवळ तिला घेऊन गेला होता.
दरम्यान तिथे साध्वी हेमलताने माझ्यावर काळदोष असल्याचं सांगितलं. ज्यामुळे जीवनात समस्यांचा सामना करावा लागेल असं सांगत तिने घाबरवलं. तसेच तगारामला माझ्यावर उपचार करण्यास सांगितलं. यादरम्यान तगारामने अनैतिक संबंध ठेवून समस्या दूर होईल असं सांगितलं. तर साध्वीने तिच्यावर लागलेला व्हिडीओ बनवण्याचा आरोप फेटाळला आहे.
'अंडर ग्राउंड रूममध्ये केला रेप'
पीडितेच्या आरोपांनुसार, 19 फेब्रुवारी 2022 ला तगाराम व साध्वी हेमलताने षडयंत्र करून तिला आश्रमात बोलवलं. साधारण सायंकाळी 8 वाजता अंडर ग्राउंडमध्ये बनवलेल्या रूममध्ये नेऊन तगारामने तिच्यासोबत रेप केला. यावेळी या घटनेचा साध्वी हेमलताने व्हिडीओ बनवला. पोलिसांनी दोघांविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. तक्रार पोस्टाच्या माध्यमातून आली. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.