Baba Siddiqui : फोन इंटरनेटचा वापर न करता कसा रचला कट?; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचं रहस्य उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 10:30 AM2024-11-22T10:30:47+5:302024-11-22T10:33:24+5:30
Baba Siddiqui : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाशी संबंधित रहस्य उघड होत आहेत.
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाशी संबंधित रहस्य उघड होत आहेत. गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान पंजाबमधून अटक करण्यात आलेल्या आकाशदीप गिलने अनेक रहस्य उघड केली आहेत. अनमोल, शुभम लोणकर आणि झिशान अख्तर यांच्याशी तो कसा बोलायचा हे सांगितलं आहे. इंटरनेट हॉटस्पॉट वापरून त्याने त्याचं लोकेशन कशा प्रकारे लपवलं, जेणेकरून कोणालाही त्याच्याबद्दल माहिती मिळू नये हे देखील सांगितलं आहे.
गुन्हे शाखेच्या चौकशीत आरोपी आकाशदीप गिल याला पंजाबच्या फाजिल्का येथून अटक करण्यात आली असून, तो मास्टरमाईंड अनमोल बिश्नोई, शुभम लोणकर आणि झिशान अख्तर आणि शूटर शिवकुमार गौतम यांच्यासह बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी त्याच्या शेतात काम करत असलेल्या मजुराच्या मोबाईलच्या हॉटस्पॉटचा वापर करायचा. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने ही युक्ती अवलंबली होती.
फोन फ्लाइट मोडवर ठेवायचा आणि...
क्राइम ब्रँचला दिलेल्या माहितीत बलविंदर नावाच्या मजुरानेही इंटरनेट कॉल्ससाठी त्याचा हॉटस्पॉट वापरल्याची पुष्टी केली आहे. चौकशीदरम्यान गिलने या मजुराचा वापर इंटरनेट हॉटस्पॉटसाठी केल्याची कबुलीही दिली. आरोपी आपला फोन फ्लाइट मोडवर ठेवायचा आणि शेतात काम करणाऱ्या बलविंदर (मजूर) याच्या हॉटस्पॉटचा वापर करून इंटरनेटशी कनेक्ट करायचा. कोणीही त्याचा फोन शोधू नये म्हणून त्याने ही युक्ती वापरली. त्यामुळे त्याचा फोन ऑफलाइन दिसायचा.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवा खुलासा
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी क्राइम ब्रँच सध्या गिलच्या मोबाईलचा शोध घेत आहे. भाऊ अनमोल बिश्नोईने स्पेशल २६ ची टीम तयार करण्यासाठी अनेक महिने घालवले होते. या लोकांना नेमण्यासाठी शूटर्सच्या नियमित मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. ऑनलाईन मुलाखती साबरमती जेलमध्ये असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतल्या होत्या