बिश्नोईचा साथीदार, मूसेवालानंतर आता बाबा सिद्दिकी हत्याकांडात नाव; कोण आहे सौरव महाकाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 03:14 PM2024-10-14T15:14:51+5:302024-10-14T15:15:30+5:30

2022 मध्ये सौरव महाकालला पुण्यातून अटक केली होती.

Baba Siddiqui Murder: Who is Saurav Mahakal? name came in Baba Siddiqui Murder Case | बिश्नोईचा साथीदार, मूसेवालानंतर आता बाबा सिद्दिकी हत्याकांडात नाव; कोण आहे सौरव महाकाल?

बिश्नोईचा साथीदार, मूसेवालानंतर आता बाबा सिद्दिकी हत्याकांडात नाव; कोण आहे सौरव महाकाल?

Baba Siddiqui murder: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आता गँगस्टर सौरभ महाकालचे (Saurabh Mahakal) नाव समोर आले आहे. एकेकाळी महाराष्ट्रातील गँगस्टर अरुण गवळीचा शार्प शूटर असलेला हा गुन्हेगार सौरव महाकाल सध्या लॉरेन्स बिश्नोईसोबत (Lawrence Bishnoi) काम करतो. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्या प्रकरणातही सौरव महाकालचे नाव पुढे आले होते. त्याला अटकही झाली होती, पण नंतर सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

मुंबई पोलिसांना बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी चौथा आरोपी झिशान अख्तरी ओळख पटली आहे. त्याच्या डायरीमध्ये पोलिसांना सौरव महाकालचे नाव आढळले आहे. झिशान अख्तरचा थेट लॉरेन्स बिश्नोईशी संबंध नाही, पण सौरव महाकालचा लॉरेन्स टोळीच्या संपर्कात आहे. याच टोळीसाठी त्याने सिद्धू मूसेवालाची हत्या घडवून आणली होती, असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, सौरव महाकाल हा अनमोल बिश्नोई(लॉरेन्स बिश्नोईचा खास) च्या सूचनेनुसार काम करतो.

2022 मध्ये पुण्यातून अटक
2022 मध्ये सौरव महाकालला दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने पुण्यातून अटक केली होती. सिद्धेश हिरामण कांबळे, असे या महाकालचे खरे नाव आहे. पूर्वी हा अरुण गवळीच्या टोळीसाठी काम करायचा. त्यावेळी तो संतोष जाधव याच्यासोबत खुनाच्या घटना घडवत असे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव महाकाल हा सुपारी घेऊन हत्या करण्यात मास्टर असून, तो कोणताही गुन्हा स्वत:च्या हाताने करण्यासाठी ओळखला जातो.

Web Title: Baba Siddiqui Murder: Who is Saurav Mahakal? name came in Baba Siddiqui Murder Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.