अन... ते बाळ थोडक्यात बचावलं, कल्याण-ठाकुर्लीदरम्यान एक्स्प्रेसवर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 07:54 PM2021-07-16T19:54:08+5:302021-07-16T19:54:58+5:30
Crime News: कल्याण - ठाकुर्ली दरम्यान सेवाग्राम एक्सप्रेस मध्ये दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला आहे.
कल्याण - लोकलवर किंवा एक्प्रेसवर दगडफेकीच्या घटना या नेहमीच घडत असतात. शुक्रवारी अशाच एका घटनेने खळबळ उडाली. कल्याण - ठाकुर्ली दरम्यान सेवाग्राम एक्सप्रेस मध्ये दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला आहे. याच रांगेत बसून प्रवास करणार पाच वर्षाच बाळ मात्र सुदैवाने बचावले आहे. बाळाला सुखरूप पाहून इतर प्रवाशांच्या जीवात जीव आला. (the baby was rescued briefly, throwing stones at the express between Kalyan and Thakurli)
शुक्रवारी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी निघणारी सेवाग्राम एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने जात असताना ठाकुर्ली- कल्याण स्थानकाच्या दरम्यान काही अज्ञात इसमांनी रेल्वे डब्यावर दगडफेक केली. यावेळी खिडकीत बसलेल्या एका प्रवाशाला दगड लागला . तर प्रवाशाच्या बाजूला बसलेले एक पाच वर्षांचे बाळ या दगडफेकीत बचावले. ही सर्व माहिती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दिली. दर एक ते दोन महिन्यात सातत्याने असा प्रकार घडत असल्याचे नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले. विशेष म्हणजे कल्याण स्थानकातील आरपीएफ जवानांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या प्रवाशांनी केला. या घटनेची अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.