बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या कथेत महिलांचं हरपलं भान; 22 गोल्डचेनची चोरी, 12 बाईक गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 04:18 PM2023-04-14T16:18:08+5:302023-04-14T16:33:32+5:30
गर्दीचा फायदा घेत चोरटेही चांगलेच सक्रिय झाले होते. त्यांनी 22 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्या.
बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या श्रीमद्भागवत कथेचा विदिशा येथे 13 एप्रिल रोजी समारोप झाला. 7 दिवसांच्या या कथेला एवढी गर्दी होती की कुठेही पाऊल ठेवायला जागा नव्हती. या गर्दीचा फायदा घेत चोरटेही चांगलेच सक्रिय झाले होते. त्यांनी 22 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्या. एवढेच नाही तर पार्किंगमध्ये लावलेल्या 12 बाईकही गायब झाल्या आहेत. विशेष म्हणजे येथून महिलांच्या पर्स आणि मोबाईलही चोरीला गेले आहेत. पण, किती चोरीच्या घटना घडल्या याची माहितीही पोलिसांकडे नाही
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेसाठी एवढी गर्दी होती की अनेक जण नातेवाईकांपासून दुरावले. काही वेळासाठी हरवले आणि नंतर सापडले. एका आकडेवारीनुसार, या कथेदरम्यान 50 हून अधिक लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडून लांब गेले होते, सर्वसामान्यांपासून ते व्हीआयपी लोक सहभागी झाले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय खासदार रमाकांत भार्गव, विदिशा प्रभारी मंत्री विश्वास सारंग, सिद्धीच्या खासदार रिता पाठक, खासदार प्रज्ञा ठाकूर, अक्षय ऊर्जा मंत्री हरदीप सिंह डंग, आरोग्य मंत्री प्रभुराम चौधरी, भोपाळच्या महापौर मालती राय आणि माजी मंत्री रामपाल सिंह. राजपूत आदींसह बडे नेते धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेत सामील झाले.
तुमचे जीवन प्रचारमय नाही तर विचारमय बनवा. अनेक लोक खोटे जीवन जगत आहेत असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी जनतेला एक आवाहनही केले. माझ्या नावाने कोणाला काही देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे. तो भक्ताची भक्ती पाहतो. विदिशा येथील कथेनंतर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, बागेश्वर धाममध्ये खूप गर्दी असते. त्यामुळेच आता दरबार धामपासून तीन ते चार किमी अंतरावर होणार आहे.
पंडित धीरेंद्र यांनीही सिव्हिल लाइन्स रोडवर असलेल्या सभागृहात जनतेला संबोधित केले. यावेळी लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले. कथेच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी जमली होती. सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कथा सुरू होण्यापूर्वीच लोक पोहोचले. विदिशाशिवाय बाहेरूनही शेकडो लोक इथे आले होते. 13 एप्रिलपर्यंत चाललेल्या श्रीमद भागवत कथेची सुरुवात 6 एप्रिल रोजी कलश यात्रेने झाली होती. यामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत लोकांनी आपले मन अध्यात्मात वाहून घेतले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"