बहिरेवाडी खून : आई- वडील सतत टोचून बोलायचे म्हणूनच मारले; मुलाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 10:24 PM2023-02-11T22:24:46+5:302023-02-11T22:25:28+5:30

अतिशय थंड डोक्याने आई- वडीलांच्यावर हल्ला  केल्यानंतर सचिन हा दरवाजांना आतून कडी लावून  घरातील माळ्यावर झोपला होता.

Bahirewadi murder: Parents were killed because they kept taunting; Confession of a son | बहिरेवाडी खून : आई- वडील सतत टोचून बोलायचे म्हणूनच मारले; मुलाची कबुली

बहिरेवाडी खून : आई- वडील सतत टोचून बोलायचे म्हणूनच मारले; मुलाची कबुली

googlenewsNext

- रवींद्र येसादे 
लोकमत न्यूज नेटवर्क  
भादवण ( जि.कोल्हापूर) :'काही काम धंदा करत नाहीस, नुसतं बसून खातोस 'असं आई-वडील सतत टोचून बोलायचे,त्याच रागातुन त्यांना खुरप्यानं मारलं,अशी कबुली बहिरेवाडी खून प्रकरणातील  संशयित आरोपी सचिन गोरूले यांने शुक्रवारी (१०) रात्री पोलीसांना घटनास्थळीच दिली.त्यामुळे पोलीसांनी त्याला अटक केली.आजरा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

     अधिक माहिती अशी, शुक्रवारी (१०) सायंकाळी बहिरेवाडी येथील वयोवृद्ध  शेतकरी कृष्णा बाबू गोरूले( वय ७०) व त्यांच्या पत्नी पारूबाई(वय ६५) यांच्यावर मुलगा सचिन ऊर्फ पप्पू यांने खुरप्याने जीवघेणा हल्ला केला.त्यात कृष्णा यांचा जागीच मृत्यू झाला.पारुबाई या अत्यवस्थ असून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.त्यांच्या पश्चात आरोपी सचिन, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

      अतिशय थंड डोक्याने आई- वडीलांच्यावर हल्ला  केल्यानंतर सचिन हा दरवाजांना आतून कडी लावून  घरातील माळ्यावर झोपला होता.पोलीसांनी रात्री उशिरा
त्याला अटक केली होती.शनिवारी न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली.
    मृत  कृष्णा यांचा चुलत नातू ऋतिक घुणके (रा. कोल्हापूर) यांच्या फिर्यादीवरून आजरा पोलिसात सचिनविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे अधिक तपास 
करीत आहेत .

खुरप्याचा वार बसले वर्मी !
 रागाच्या भरात सचिन यांने पहिल्यांदा आई पारुबाई यांच्या कपाळावर व मानेवर खुरप्याने वार केले.त्यामुळे जीव वाचवण्यासाठी त्या घरातून पळत बाहेर आल्या.त्यानंतर त्यांने घराचे दरवाजे आतून बंद करून वडील कृष्णा यांच्या चेहऱ्यावर व गळ्यावर वार केले.खुरप्याचा वार वर्मी लागून कृष्णा हे जागीच ठार झाले तर पारुबाई हया आई गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांची प्रकृती गंभीर आहे

  अंत्यसंस्काला येण्याची वेळ 
मृताची विवाहित मुलगी
बेलेवाडीत राहते.माहेरच्या लक्ष्मी यात्रेसाठी ती शुक्रवारी संध्याकाळी बहिरेवाडीला येणार होती.परंतु,यात्रेऐवजी वडिलांच्या अंत्यसंस्काराला येण्याची वेळ तिच्यावर आली.  शनिवारी दुपारी मृत कृष्णा यांच्यावर बहिरेवाडी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Bahirewadi murder: Parents were killed because they kept taunting; Confession of a son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.