माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या सहाही शिवसैनिकांना जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 02:25 PM2020-09-12T14:25:58+5:302020-09-12T14:26:24+5:30
कांदिवलीतील समतानगरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना काल शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्स अॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे कांदिवलीत शिवसैनिकांनी ६५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार काल घडला होता. या प्रकरणी समता नगर पोलिसांनी सहा शिवसैनिकांना अटक केली. अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. आरोपींमध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम (३९) यांचाही समावेश आहे. संजय शांताराम मांजरे, (52), राकेश राजाराम बेळणेकर (31), प्रताप मोतीरामजी सुंदवेरा (45), सुनिल विष्णू देसाई (42), राकेश कृष्णा मुळीक (35) अशी इतर आरोपींची नावे आहेत.
कांदिवलीतील समतानगरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना काल शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. काल दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. मारहाणीत मदन शर्मा यांच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याला इजा झाली. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मदन काशिनाथ शर्मा यांनी त्यांच्याकडील ‘महानगर -1’ या व्हॉट्स अॅप ग्रुपवर राजकीय पुढार्यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र फॉरवर्ड केले. या कारणावरुन कमलेश कदम आणि इतर आठ ते दहा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीला मारहाण करत डोळ्याला दुखापत केली म्हणून समता नगर पोलीस ठाणे येथे भा. दं. वि.कलम 325, 143, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शनिवारी सकाळी कोर्टात हजर केले असता सहाही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला.
Shiv Sena's Kamlesh Kadam and five others, arrested in connection with the attack on a retired Navy officer, granted bail by Samta Nagar Police Station. #Mumbaihttps://t.co/vK9mC7lnyb
— ANI (@ANI) September 12, 2020
अभिनेत्री कंगना राणावत के कार्यालय की तोड़फोड़ करके अपनी मर्दानगी दिखाने वाले सत्ताधारी शिवसेना ने अब सत्ता के मद में एक बुजुर्ग भूतपूर्व नौसेना अधिकारी मदन शर्मा को मारपीट करते हुए उनकी आंख को जबरदस्त चोट पहुंचाई है। मुख्यमंत्री घरबैठे तानाशाही चला रहे है। pic.twitter.com/qF2NVcIN55
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 11, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक
रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार?
आजची रात्रही जेलमध्येच, रिया - शोविकच्या जामिनावर उद्या कोर्ट देणार निर्णय
कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने पुढे ढकलली
हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल
बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले
दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला
सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम
धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या