राष्ट्रवादीच्या ४ पदाधिकाऱ्यांना जामीन मंजुर; सहायक आयुक्त मारहाण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 05:08 PM2023-02-28T17:08:08+5:302023-02-28T17:09:29+5:30
महेश आहेर मारहाण प्रकरण
ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषिसंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची सहायक आयुक्त महेश आहेर यांची कथीत आॅडीओ क्लिप वायरल झाल्यानंतर आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर केलेल्या मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या राष्ट्रवादीच्या चारही पदाधिकाऱ्यांना मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला.
ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मारहाण केली होती. या मारहाणी प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, लोकसेवकाला मारहाण, शस्त्रास्त्र कायदा कलमांतर्गत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्र म खामकर, हेमंत वाणी आणि विंशीत गायकवाड या चौघांना अटक केली होती. ठाणे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मंगळवारी अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.