शिल्पा शेट्टीच्या आईविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी, कर्ज परतफेडीशी संबंधित प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 20:29 IST2022-03-16T20:28:53+5:302022-03-16T20:29:26+5:30
warrant issued against Shilpa Shetty's mother : फसवणूक प्रकरणी त्यांची आई सुनंदा आणि बहीण शमिता शेट्टी यांच्या विरोधात समन्स बजावण्यात आले होते. हा गुन्हा एका व्यावसायिकाने दाखल केला असून हे प्रकरण कर्जफेडीचे आहे.

शिल्पा शेट्टीच्या आईविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी, कर्ज परतफेडीशी संबंधित प्रकरण
मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या न्यायामूर्तींनी मंगळवारी शिल्पा शेट्टीच्या आईविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले. हे प्रकरण 21 लाख रुपयांचे कर्ज न फेडण्याशी संबंधित आहे. यापूर्वी न्या. आर आर खान यांनी शिल्पा शेट्टीला आदेश दिला होता. फसवणूक प्रकरणी त्यांची आई सुनंदा आणि बहीण शमिता शेट्टी यांच्या विरोधात समन्स बजावण्यात आले होते. हा गुन्हा एका व्यावसायिकाने दाखल केला असून हे प्रकरण कर्जफेडीचे आहे.
न्यायालयाने सुनंदा शेट्टी यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. या प्रकरणाला शिल्पा शेट्टीच्या कुटुंबीयांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. सोमवारी सत्र न्यायालयाचे न्या. ए झेड खान यांनी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यांनी शमिता शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांना दिलासा दिला. मात्र, सुनंदा शेट्टी यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.
सुरेंद्र शेट्टी आणि त्यांची पत्नी सुनंदा शेट्टी या फर्ममध्ये भागीदार आहेत
विशेष म्हणजे या फर्ममध्ये सुरेंद्र शेट्टी आणि त्यांची पत्नी सुनंदा शेट्टी हे भागीदार आहेत. या कंपनीत शमिता शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांचाही सहभाग असल्याचे दाखवण्यासाठी असा कोणताही दस्तावेज देण्यात आलेला नाही. आता त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
शिल्पा शेट्टीचे वडील सुरेंद्र शेट्टी यांनी 2015 मध्ये हे पैसे घेतले होते
सुरेंद्र शेट्टी यांनी हे पैसे त्यांच्याकडून 2015 मध्ये घेतले होते आणि जानेवारी 2017 मध्ये परत करणार होते. पण त्यांनी त्याची परतफेड कधीच केली नाही.शिल्पा शेट्टी ही एक चित्रपट अभिनेत्री आहे.तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.तिच्या चित्रपटांना चांगलीच पसंती मिळाली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.