रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे जेरबंद, अडीच महिन्यांपासून देत होता गुंगारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 03:31 AM2021-03-14T03:31:05+5:302021-03-14T06:53:45+5:30

रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट (ता. पारनेर) परिसरात गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र फरार झाला होता. (Rekha Jare)

Bal Bothe, accused in Rekha Jare murder, has been in arrested | रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे जेरबंद, अडीच महिन्यांपासून देत होता गुंगारा

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे जेरबंद, अडीच महिन्यांपासून देत होता गुंगारा

Next

 अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ जगन्नाथ बोठे याला अखेर अडीच महिन्यांनी नगर पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून अटक केली. हत्येच्या घटनेवेळी बाळ बोठे हा सकाळ वृत्तपत्राचा नगरचा कार्यकारी संपादक होता. (Bal Bothe, accused in Rekha Jare murder, has been in arrested)

बोठेसह त्याला मदत करणारे आंध्र प्रदेशातील जनार्दन चंद्राप्पा, राजशेखर चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ व महेश वसंतराव तनपुरे (रा. नवलेनगर, सावेडी, अहमदनगर) यांनाही अटक केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैदराबाद) ही महिला आरोपी फरार आहे.

रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट (ता. पारनेर) परिसरात गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र फरार झाला होता. बोठे हा हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहा पोलीस पथकांनी पाच दिवस हैदराबाद येथील बिलालनगर परिसरात शोध घेऊन बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या आरोपींना जेरबंद केले.

बंद खोलीचा दरवाजा तोडला अन्...
- हैदराबाद येथील गुन्हेगारांचे आश्रयस्थान अशी ओळख असलेल्या बिलालनगर परिसरातील प्रतिभानगर येथील एका हाॅटेलमध्ये बोठे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 
- हाॅटेलच्या १०९ क्रमांकाच्या खोलीच्या दरवाजाला बाहेरून कुलूप होते. पोलिसांनी कुलूप तोडले तेव्हा आतमध्ये बोठे होता. बोठे हा वेशांतर करून मागील ८० ते ८२ दिवसांपासून बिलालनगर परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे.

बदनामीच्या भीतीपोटी केली हत्या
- रेखा जरे आपली बदनामी करू शकतात. त्यांच्यामुळे गुन्हे दाखल होतील, अशी भीती आरोपीस होती. 
- या भीतीपोटीच त्याने जरे यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

Web Title: Bal Bothe, accused in Rekha Jare murder, has been in arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.