धक्कादायक! हात जोडून, ​​कान पकडून चोराने मागितली माफी अन् नंतर चोरली दुर्गा मातेची मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 05:56 PM2024-01-14T17:56:30+5:302024-01-14T17:57:30+5:30

एका मंदिरातून मूर्ती चोरीला गेली आहे. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

balmukhi mata temple meerut theft of ashtadhatu idol viral video | धक्कादायक! हात जोडून, ​​कान पकडून चोराने मागितली माफी अन् नंतर चोरली दुर्गा मातेची मूर्ती

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका मंदिरातून मूर्ती चोरीला गेली आहे. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक तरुण मंदिरात पोहोचल्याचं दिसतं. मग तो देवीपुढे हात जोडतो, कान पकडतो, माफी मागतो आणि तिथे ठेवलेली दुर्गा मातेची मूर्ती चोरतो. ही घटना मेरठच्या सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन परिसरातील बालमुखी माता मंदिरात घडली.

मेरठच्या सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन हद्दीतील स्पोर्ट्स स्टेडियमजवळ बालमुखी मातेचं मंदिर आहे. आचार्य प्रदीप गोस्वामी त्याची देखभाल करतात. शनिवारी सकाळी मंदिराचे पुजारी येथे पोहोचले असता, दुर्गादेवीची अष्टधातूची मूर्ती न दिसल्याने ते चक्रावून गेले. यानंतर चोरीची लाईव्ह घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

यामध्ये एक तरुण प्रार्थना करताना दिसत आहे. तो मंदिराच्या आत जातो आणि हात जोडून उभा राहतो. यानंतर, माफी मागतो आणि अष्टधातूची मूर्ती चोरून निघून जातो. दरम्यान, त्याने मंदिराच्या काचेचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केला. त्याने ट्रॅकसूट घातला होता. डोक्यावर टोपी घातली होती. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या प्रकरणी मेरठ पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे की, सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन परिसरात अज्ञात व्यक्तीने मंदिरात चोरी केली आहे. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटली असून मूर्ती जप्त करण्यात आली आहे. आरोपीवर पुढील कारवाई सुरू आहे.
 

Web Title: balmukhi mata temple meerut theft of ashtadhatu idol viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.