धक्कादायक! 6 कर्मचाऱ्यांनी बँकेत केला तब्बल 5 कोटींचा घोटाळा; झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 09:47 AM2023-09-23T09:47:32+5:302023-09-23T09:49:45+5:30

बँकेत तैनात असलेल्या 6 कर्मचाऱ्यांनी सुमारे 5 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता, त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली.

banda cooperative bank scam 6 employees committed scam of 5 crore caught 3 | धक्कादायक! 6 कर्मचाऱ्यांनी बँकेत केला तब्बल 5 कोटींचा घोटाळा; झाला पर्दाफाश

फोटो - hindi.news18

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील कोऑपरेटिव्ह बँकेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांनी 2018 मध्ये 5 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. यानंतर एसआयबी टीम संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होती. एसआयबीचे पथक शुक्रवारी बांदा येथे पोहोचले आणि पोलिसांच्या मदतीने तीन आरोपींना अटक केली. तीन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

संपूर्ण प्रकरण बांदा जिल्ह्यातील बिसंडा पोलीस स्टेशन हद्दीतील ओरन गावचं आहे, ओरन कोऑपरेटिव्ह बँकेत तैनात असलेल्या 6 कर्मचाऱ्यांनी सुमारे 5 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता, त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी एसआयबी टीमकडे देण्यात आली होती. एसआयबीचे पथक या प्रकरणाचा सातत्याने तपास करत होते.

दरम्यान, तपासादरम्यान सहा बँक कर्मचाऱ्यांनी मिळून एवढा मोठा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी एसआयबीचे पथक शुक्रवारी बांदा येथे पोहोचलं आणि तीन आरोपींना अटक केली. इतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलीस आणि एसआयबीचे पथक अन्य तिघांचा शोध घेत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना बिसंडा पोलीस ठाण्याचे अध्यक्ष कृष्ण कुमार त्रिपाठी म्हणाले की, लखनौहून एसआयबीची टीम आली होती. त्यांच्यासोबत पोलीसही पाठवण्यात आले. तपासादरम्यान तिघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. या बँक कर्मचाऱ्यांनी बँकेत मोठा घोटाळा केला असून न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: banda cooperative bank scam 6 employees committed scam of 5 crore caught 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.