येता जाता करायचा अश्लील चाळे, मुलीच्या शिक्षिकेला पाठवलेलं प्रेम पत्र; अय्याश बापाला पोलिसांनी शिकवला धडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 04:30 PM2022-11-03T16:30:18+5:302022-11-03T16:31:14+5:30

उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका वडिलांनी आपल्याच मुलीच्या शाळेतील शिक्षिकेला प्रेमपत्र पाठवलं.

banda news government female teacher accuses student father of molesting | येता जाता करायचा अश्लील चाळे, मुलीच्या शिक्षिकेला पाठवलेलं प्रेम पत्र; अय्याश बापाला पोलिसांनी शिकवला धडा!

येता जाता करायचा अश्लील चाळे, मुलीच्या शिक्षिकेला पाठवलेलं प्रेम पत्र; अय्याश बापाला पोलिसांनी शिकवला धडा!

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका वडिलांनी आपल्याच मुलीच्या शाळेतील शिक्षिकेला प्रेमपत्र पाठवलं. यानंतर शाळेत आणि संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. बऱ्याच दिवसांपासून हा व्यक्ती मुलीच्या शिक्षिकेला त्रास देत होता. शिक्षिका कुठे बाहेर दिसायची तेव्हा आरोपी तिचा रस्ता अडवून अश्‍लील इशारे करायचा. महिला शिक्षिकेनं विरोध केल्यानं आरोपीनं तिला धमकावून पैशांची मागणी करण्यासही सुरुवात केली होती. एक दिवस तर रस्ता अडवून नराधमाने शिक्षिकेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करत हद्दच ओलांडली.

व्यथित झालेल्या महिला शिक्षिकेने पोलिसात तक्रार केली. या घटनेला दुजोरा देताना बांदा पोलीस अधीक्षक अभिनंदन सिंह यांनी हे प्रकरण गिरवान पोलीस स्टेशन हद्दीतील असून एका महिला शिक्षिकेनं गावातीलच एका व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत. महिला शिक्षिकेनं तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार गावातील व्यक्तीनं तिला येता-जाता त्रास दिला आणि तिच्यासोबत अश्लील वर्तन केलं. तसेच नकार दिल्यावर पैशांची मागणी केली. अनेक वेळा समजावूनही तो काही ऐकला नाही. त्यानंतर त्यानं एके दिवशी आपल्या मुलीच्या हातून शिक्षिकेला प्रेमपत्र पाठवलं. सध्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी आरोपीला कारागृहात पाठवले
एसपी अभिनंदन म्हणाले की, महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, पोलीस आता याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Web Title: banda news government female teacher accuses student father of molesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.