बापरे! हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढते 'ही' हसीना; प्रेमाचा बनाव करून 50 लाखांचा 'असा' घालते गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 11:42 AM2022-12-23T11:42:59+5:302022-12-23T11:50:28+5:30
महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायची आणि त्यांच्याशी अश्लील चॅटिंग करत होती.
लोकांना हनी ट्रॅपमध्ये फसवणाऱ्या जाहिला बेगम या महिलेला उत्तर प्रदेशातील बांदा पोलिसांनी अटक केली आहे. अनेक दिवसांपासून ही महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायची आणि त्यांच्याशी अश्लील चॅटिंग करत होती. जवळपास 6 महिन्यांपूर्वी बांदा शहरातील रहिवासी असलेला सुप्रसिद्ध सराफा व्यावसायिक या महिलेच्या जाळ्यात आला होता. हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्यानंतर महिलेने शहरातील व्यावसायिकासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर व्हिडिओ बनवत त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला.
महिला व्यावसायिकाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होती. या बदल्यात त्याच्याकडून सुमारे 50 लाख रुपयांची मागणी केली होती. याच दरम्यान तिला काही पैसे दिल्यानंतरही फसवणूक करणारी महिला व्यावसायिकाकडे सतत मोठ्या रकमेची मागणी करत होती. जर पैसे नाही दिले तर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी वारंवार देत होती. या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने राहत्या घराजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर या सगळ्या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी याची कसून चौकशी करत त्या महिलेला अटक केली आहे.
काही दिवसांत ही महिला तुरुंगातून बाहेर आल्यावर तिने पुन्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असाच धक्कादायक प्रकार सुरू केला होता. पुन्हा लखनऊ येथील सहद गया गंज येथील रहिवासी इरसद शहाद खान याला जाळ्यात अडकवले होते. त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्याच्याशी अश्लील चॅटिंगही करू लागला. त्यानंतर सतत त्याच्या संपर्कात आल्यानंतर महिलेने त्यालाही ब्लॅकमेल करून 30 ते 40 लाख रुपये उकळले. यानंतर तरुणाने लखनौ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
बांदा पोलिसांनी याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. तीन पथके स्थापन करून पोलीस महिलेचा शोध घेत होते. ती पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर बांदा पोलिसांनी महिलेची पुन्हा एकदा कारागृहात रवानगी केली आहे. फसवणूक करणारी महिला बांदा शहरातील जरैली कोठी, भागातील रहिवासी असून ती ब्युटी पार्लरच्या नावाखाली सर्व अश्लील काम करते.. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधीक्षक बांदा यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"