वांद्रे स्थानक गर्दी प्रकरण : सायबरकडून 'त्या' 30 खात्याचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 10:30 PM2020-04-15T22:30:26+5:302020-04-15T22:31:21+5:30

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

Bandra Station crowds case: Cyber investigating that '30' accounts pda | वांद्रे स्थानक गर्दी प्रकरण : सायबरकडून 'त्या' 30 खात्याचा शोध सुरु

वांद्रे स्थानक गर्दी प्रकरण : सायबरकडून 'त्या' 30 खात्याचा शोध सुरु

Next

मुंबई  : मुंबईत कोरोनाचा कहर सुरु असताना वांद्रे स्थानकात मंगळवारी एकाच वेळी हजारो नागरिक एकत्र आल्याने लॉकडाऊनचा पुरता फजजा  उडाला. ही अफ़वा पसरविण्यामागे एका वृत्त वाहिनीवर दाखविण्यात आलेले त्यासबंधीचे वृत्त आणि त्याच बरोबर विविध 30 अकॉऊंटवरून त्याबाबत देण्यात आलेली चुकीची माहिती कारणीभूत ठरल्याचे आतापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे. 

महाराष्ट्र सायबर शाखेकडून या 30 अकाउंट चालकाचा  शोध घेण्यात येत आहे. रेल्वे सुरु होणार असून त्यासाठी  वांद्रे स्थानकात बुकिंग सुरु आहे, अशा आशयाचा मेसेज त्यावरून देण्यात आला होता. त्यामुळे गर्दीत आणखी वाढ झाली.  त्यामुळे  त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली जाणार आहे.  

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी  अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सायबर शाखेकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Bandra Station crowds case: Cyber investigating that '30' accounts pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.