सचिन वाझेला धक्का; घरातच नजरकैद ठेवण्याची मागणी कोर्टानं फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 10:12 PM2021-09-29T22:12:56+5:302021-09-29T22:13:31+5:30
Sachin Vaze : वाझेला घरचं जेवण देण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.
सचिन वाझेला आणखीन दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार आहे. बायपास सर्जरीनंतर काहीकाळ घरातच नजरकैदेत ठेवण्याची वाझेची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. वाझेला वोकहार्ट हॉस्पिटलमधून जेलमध्ये नेण्याची परवानगी देण्यात आली असून गरज पडल्यास जे जे रुग्णालयातील जेल वॉर्डात दाखल करण्यास मुभा कोर्टाकडून देण्यात आली आहे. मात्र वाझेला घरचं जेवण देण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.
अँटिलिया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर वाझेवर मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात सर्जरी करण्यात आली आहे. यावेळी रुग्णालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
सचिन वाझे गेले काही दिवस भिवंडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. हृदय विकाराचा त्रास असल्याने शस्त्रक्रियेसाठी सोमवारी मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवाऱी ओपन हार्ट सर्जरी पार पडली. कार्डिअॅक सर्जन डॉ कमलेश जैन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ अंकुर आणि डॉ केदार यांच्या टीमने वाझेवर शस्त्रक्रिया केली. वाझेची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टराकड़ून सांगण्यात आले होते.