Crime News: पैशासाठी सैतान झाला बाप! स्वतःच्या मुलावर थिनर टाकून पेटवले; उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 18:49 IST2022-04-07T18:48:57+5:302022-04-07T18:49:52+5:30
Crime News: बंगळुरूमध्ये एका संतापलेल्या बापाने स्वतःच्या मुलाला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Crime News: पैशासाठी सैतान झाला बाप! स्वतःच्या मुलावर थिनर टाकून पेटवले; उपचारादरम्यान मृत्यू
बंगळुरू: पैशांसाठी लोक वाट्टेल त्या थराला जातात, याचे एक ताजे उदाहरण कर्नाटकमधून समोर आले आहे. राजधानी बंगळुरुमध्ये नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेत पैशांसाठी वडिलांनी आपल्या मुलाला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 1 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेची सीसीटीव्ही फुटेजही समोर आली आहे.
बापाने मुलाला जिवंत जाळले
मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल रोजी बंगळुरुतील चामराजा पेट परिसरात व्यावसायिक सुरेंद्र आणि अर्पित यांच्यात व्यवसायाच्या पैशावरुन वाद झाला. यानंतर संतापलेल्या सुरेंद्रने कलरमध्ये वापरले जाणारे थिनर अर्पितवर शिंपडले. वडील यापेक्षा पुढे जाऊ शकतील अशी अर्पितला अपेक्षा नव्हती, त्यामुळेच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. पण, सुरेंद्रला राग इतका अनावर झाला की, त्याने मुलाच्या अंगावर माचिसची काडी टाकून जाळले.
उपचारादरम्यान अर्पितचा मृत्यू झाला
आग लागताच अर्पित सैरावैरा धावत सुटला. त्याच्या शरीरावर लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले. यावेली शेजाऱ्यांनी आग विझवून अर्पितला रुग्णालयात नेले. पण, आज(गुरुवारी) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत वडील सुरेंद्रला अटक केली आहे.