विनापरवाना भारतात राहणारे बांग्लादेशी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:29 PM2019-05-03T14:29:49+5:302019-05-03T14:31:56+5:30

भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम 3 (अ), 6 (अ) सह विदेशी अधिनियम कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Bangladeshi are arrested who are resident in India without permission | विनापरवाना भारतात राहणारे बांग्लादेशी अटकेत

विनापरवाना भारतात राहणारे बांग्लादेशी अटकेत

Next
ठळक मुद्देनालासोपारा पश्चिमेकडील टाकीपाडा परिसरात विनापरवाना तीन बांगलादेशी राहणाऱ्या तरुणांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने पकडले नालासोपारा पोलिसांना तपासासाठी ताब्यात देण्यात आले आहे.

नालासोपारा - नालासोपारा पश्चिमेकडील टाकीपाडा परिसरात विनापरवाना तीन बांगलादेशी राहणाऱ्या तरुणांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने पकडले असून नालासोपारा पोलीस ठाण्यात भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम 3 (अ), 6 (अ) सह विदेशी अधिनियम कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील टाकीपाडा परिसरातील सारा अपार्टमेंटच्या रूम नंबर 402 मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने धाड मारून विपुल युनूस मिया (24), नासीर हुसेन इस्माईल शेख (22) आणि सुमय्या यास्मिन सुमा इद्रिस अली (24) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना भारतात राहण्याचा पुरावा मागितला असता काहीही नसल्याने अखेर त्यांना अटक करून नालासोपारा पोलिसांना तपासासाठी ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Bangladeshi are arrested who are resident in India without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.