नवी मुंबई पाठोपाठ मुंब्रा येथून बांगलादेशीला अटक
By मनीषा म्हात्रे | Updated: December 22, 2023 17:58 IST2023-12-22T17:56:52+5:302023-12-22T17:58:02+5:30
सरदार अजीज राणा शेख (४३) असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशीचे नाव आहे.

नवी मुंबई पाठोपाठ मुंब्रा येथून बांगलादेशीला अटक
मुंबई : नवी मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या दोन बांगलादेशींना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या. या कारवाईपाठोपाठ मुंब्रा परिसरातून एकाला आणखीन एकाला अटक करण्यात आली आहे. सरदार अजीज राणा शेख (४३) असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशीचे नाव आहे.
दहशतवाद विरोधी विभागाच्या ठाणे युनिटने ही कारवाई केली आहे. शेख हा मुंब्रा येथील कौसा मधील रशीद कंपाउंडमध्ये राहत असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, गुरुवारी त्याला ताब्यात घेत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. मुंब्रा पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.
यापूर्वी एटीएसच्या विक्रोळी युनिटने नवी मुंबईतून खलील मैनुददीन सैयद (३०), हशुमुल्ला हसन शेख (२२) या दोघांना अटक केली होती. याप्रकरणी कामोठे पोलीस अधिक तपास करत आहे.