बोगस कागदपत्रांद्वारे बँकेतून कर्ज उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 08:43 PM2019-01-02T20:43:43+5:302019-01-02T20:45:01+5:30

अखिलेश गुप्ता आणि दिपक दांगट असे या आरोपींची नाव आहे. या टोळीतील तिसरा आरोपी धिरेंद्र सिंग याचा पोलीस शोध घेत आहेत.

Bank busted by bank documents, exposed bogus documents | बोगस कागदपत्रांद्वारे बँकेतून कर्ज उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

बोगस कागदपत्रांद्वारे बँकेतून कर्ज उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

Next
ठळक मुद्दे व्यावसायिक मेहबुब अन्वर खान यांना काही दिवसांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून कर्जाचे हप्ते भरण्यासंदर्भात नोटीस आली.मेहबुब यांच्या नावाने नुकतेच कुणीतरी 6 लाखांचे वाहन कर्ज काढले होते. आपल्या नावाने होत असलेल्या फसवणुकीबाबत मेहबुबने डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

मुंबई - बनावट कागदपत्रांच्या मदतीने नवीन महागड्या कार कर्जावर घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा डोंगरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अखिलेश गुप्ता आणि दिपक दांगट असे या आरोपींची नाव आहे. या टोळीतील तिसरा आरोपी धिरेंद्र सिंग याचा पोलीस शोध घेत आहेत.

डोंगरी परिसरात राहणारे व्यावसायिक मेहबुब अन्वर खान यांना काही दिवसांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून कर्जाचे हप्ते भरण्यासंदर्भात नोटीस आली. कोणते ही कर्ज घेतले नसताना ही नोटीस कशी काय पाठवली याबाबत मेहबुक चौकशी करण्यासाठी हिंदुजा लेलँन्ड फायनान्स कंपनीच्या विक्रोळी येथील कार्यालयात घेतले. चौकशीत त्याच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या मदतीने 2012 पासून अनेकदा कर्ज घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. कर्जासाठी जमा करण्यात आलेल्या कागदपत्रात मेहबुब यांचा नावाचे आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनिंग कार्ड ही बनवले होते. पत्ता ही सारखाच होता. मात्र, फोटो तिसऱ्याच व्यक्तीचा होता. मेहबुब यांच्या नावाने नुकतेच कुणीतरी 6 लाखांचे वाहन कर्ज काढले होते. आपल्या नावाने होत असलेल्या फसवणुकीबाबत मेहबुबने डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस तपासणीत या सर्व प्रकरणीत कंपनीचे अधिकारी अखिलेश गुप्ता आणि दिपक दांगट यांनीच हे सर्व केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. या प्रकरणातील त्यांचा तिसरा आरोपी धिरेंद्र सिंग हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Bank busted by bank documents, exposed bogus documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.