बँक मॅनेजरनं खातेदारांचे पैसेच ऑनलाइन सट्ट्यात उडवले; ग्राहक आले टेन्शनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 09:36 PM2022-01-21T21:36:33+5:302022-01-21T21:37:34+5:30

Fraud Case : या घटनेमुळे ग्राहक असलेल्या बँक खातेदारांना जबरदस्त धक्का बसला आहे.

Bank manager duped bank account holders' money in online betting; Customers came in tension | बँक मॅनेजरनं खातेदारांचे पैसेच ऑनलाइन सट्ट्यात उडवले; ग्राहक आले टेन्शनमध्ये

बँक मॅनेजरनं खातेदारांचे पैसेच ऑनलाइन सट्ट्यात उडवले; ग्राहक आले टेन्शनमध्ये

Next

मुंबई - कोरोनामुळे बहुतांश गोष्टी ऑनलाईन सुरू आहेत. शाळा, कार्यालये आणि बरेच व्यवहार  देखील ऑनलाईन डिजिटल पर्यायाचा वापर करून सुरु आहेत. मुंबईत दादरमध्ये एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.  मुंबईतील दादर भागातील एका बँक मॅनेजरने खातेदारांचे पैसेदेखील ऑनलाईन सट्ट्यात उडवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे ग्राहक असलेल्या बँक खातेदारांना जबरदस्त धक्का बसला आहे. या प्रकरणात बँकेतील दादर शाखेतील उपशाखा व्यवस्थापक विशाल गरूड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील दादर परिसरातील एका खासगी बँकेच्या मॅनेजरला ऑनलाईन सट्टा खेळण्याचा नाद होता. या नादाच्या भरात त्याने बँक खातेदारांचे कोट्यवधी रुपये सट्ट्यात उडवले. त्याने खात्यातील रक्कम परस्पर वेगवेगळ्या खात्यात वळवली. बँक मॅनेजरने तब्बल १ कोटी ८५ लाख रुपये सट्ट्यात गमावले आहेत. 

मुलीवर बलात्कार केल्याचा बापानं घेतला बदला; आरोपीला कोर्टासमोरच गोळी झाडून केलं ठार

‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ पाहून अल्पवयीन मुलांनी बनवली ‘बदनाम गँग’, प्रसिद्धीसाठी केली हत्या

या प्रकरणात बँकेतील दादर शाखेतील उपशाखा व्यवस्थापक विशाल गरूड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांच्या छाननीत नोंदीपेक्षा रोकड जास्त असल्याचं दिसलं. मात्र, प्रत्यक्ष तपासणात १ कोटी ८५ लाखांचा तुट असल्याचं उघडकीस आलं होतं. त्यानंतर विशालने बनावट व्यवहारांची नोंद करून बुकींच्या ९ बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केल्याचं उघडकीस आलं आहे. त्याच्याविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bank manager duped bank account holders' money in online betting; Customers came in tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.