बँकेच्या ऑफिसबॉयने केला एक लाख ३५ हजारांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 04:12 PM2019-09-18T16:12:26+5:302019-09-18T16:14:28+5:30
आरोपी भारतीय स्टेट बँकेच्या प्राधिकरण आकुर्डी शाखेत ऑफिसबॉय आहे.
पिंपरी : बँकेतील कॅशिअर रुममध्ये रोख रकमेचे बंडल पॅकिंग करताना ऑफिसबॉयने पैसे काढून घेतले. एक लाख ३५ हजारांचा अपहार ऑफिसबॉयने केला. आकुर्डी येथे हा प्रकार घडला. फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कारथिकेयन चिन्नायन (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप श्रीधर जाधव (वय ३२, रा. मोशी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जाधव भारतीय स्टेट बँकेच्या प्राधिकरण आकुर्डी शाखेत ऑफिसबॉय आहे. फिर्यादी चन्नायन भारतीय स्टेट बँकेच्या प्राधिकरण आकुर्डी शाखेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून नोकरीस असताना आरोपी संदीप जाधव याने वरिष्ठ रोखपाल श्रध्दा बिबिकर यांच्या सोबत काम करत असताना कॅशिअर रुममध्ये रोख रकमेचे बंडल पॅकिंग करीत असताना रोख रकमेमधून वारंवार पैसे काढून सदरची रोकड स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता वापरून एकूण एक लाख ३५ हजारांचा अपहार केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.