अयोध्या : महिला बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; IPS सह ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रवृत्त आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 10:08 AM2021-10-31T10:08:03+5:302021-10-31T10:08:24+5:30

Crime News : लग्न करत नसल्यानं एक व्यक्ती पोलिसांमार्फत फोन करून त्रास देत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप.

bank woman officer commits suicide in ayodhya three policemen including ips officer accused of abetting | अयोध्या : महिला बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; IPS सह ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रवृत्त आरोप

अयोध्या : महिला बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; IPS सह ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रवृत्त आरोप

Next

अयोध्येतील एका महिला बँक कर्मचाऱ्यानं शनिवारी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. त्या महिला अधिकाऱ्याचं नाव श्रद्धा गुप्ता असं अशून त्या पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) कार्यरत होत्या. दरम्यान, गुप्ता यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली आयपीएस अधिकारी आशिष तिवारी यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. श्रद्धा गुप्ता यांनी शनिवारी आपल्या भाड्याच्या घरात आत्महत्या केली.

दरम्यान, आपल्या आत्महत्येसाठी आयपीएस अधिकारी आशिष तिवारी, हेड कॉन्स्टेबल अनिल रावत आणि विवेक गुप्ता हे जबाबदार असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. श्रद्धा या गेल्या पाच वर्षांपासून अयोध्येतील पंजाब नॅशनल बँक येथे कार्यरत होत्या. कुटुंबीय त्यांना रात्री फोन करत होते, परंतु त्यांनी फोनच उचलला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांचे भाऊ रितेश गुप्ता यांनी दिली. रात्री त्या झोपल्या असतील असं घरच्यांना वाटलं. परंतु सकाळी १०-१२ वेळा फोन केल्यानंतरही त्यांनी फोन न उचलल्यानं घरच्यांनी घाबरून घरमालकाला फोन केला. त्यानंतर त्यांनी घरी पाहिल्यानंतर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचं दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं.

श्रद्धा यांनी ज्या तीन लोकांचं नाव लिहिलं आहे, त्यापैकी आयपीएस आशिष तिवारी हे अयोध्येत एसएसपी म्हणून काही वर्षांपूर्वी कार्यरत होते. तर विवेक गुप्ता यांच्याशी त्यांचं लग्न ठरलं होतं. परंतु त्यांचं वागणूक योग्य नसल्यानं त्यांनी लग्नाला नकार दिला होता, अशी माहितीही समोर आली आहे. दरम्यान, विवेक हा श्रद्धा यांना त्रास देत होता आणि मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून फोन करून सतावत होता, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. दरम्यान, पोलिसांनी आयपीएस आशिष तिवारी यांच्यासह तिघांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.

Web Title: bank woman officer commits suicide in ayodhya three policemen including ips officer accused of abetting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.