1 लाख रुपये आणि दोन वर्षांचा तुरुंगवास... बँक कर्मचाऱ्यांची चूक विडी कामगाराला पडली भारी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 08:20 AM2023-03-28T08:20:33+5:302023-03-28T08:21:03+5:30
ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली. जीतराय सामंत असे या व्यक्तीचे नाव आहे.
पश्चिम सिंहभूम : झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका विडी बनवणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीला तुरुंगात जावे लागले. या व्यक्तीचा आधार क्रमांक एका महिलेच्या खात्याशी लिंक करण्यात आला होता. त्यानंतर या व्यक्तीने आपल्या आधार क्रमांकाद्वारे कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन पैसे काढण्यास सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांत व्यक्तीने महिलेच्या खात्यातून एक लाख रुपये काढले. दरम्यान, ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली. जीतराय सामंत असे या व्यक्तीचे नाव आहे.
झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील विडी कामगार जीतराय सामंत याला एका महिलेच्या खात्यातून पैसे काढल्याप्रकरणी राज्य पोलिसांनी अटक केली आहे, ज्याचे बँक खाते संबंधित महिलेच्या आधार क्रमांकाशी चुकीच्या पद्धतीने जोडले गेले होते. दोन वर्षांपूर्वी जीतराय सामंत हे कॉमन सर्व्हिस सेंटरवर गेले होते, तेव्हा या पैशांची माहिती त्याला मिळाली होती. याप्रकरणी तपासाशी परिचित असलेल्या सूत्रांनुसार, कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये एक बँक प्रतिनिधी देखील होता, ज्याने लाभार्थीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी मदत करत होता.
दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लागुरी नावाच्या महिलेने झारखंड स्टेट ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकाकडे आपल्या खात्यातून पैसे गायब झाल्याची तक्रार केली तेव्हा ही बाब उघडकीस आली. व्यवस्थापकाने अधिकाऱ्यांना पत्र लिहून चूक लक्षात आल्यानंतर जीतराय सामंत याला पैसे परत करण्यास सांगितले. त्यानंतर जीतराय सामंत याने पैसे परत केले नाही. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 406 (गुन्हेगारीचा भंग) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत जिल्ह्याच्या मुफसिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जीतराय सामंतला 24 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. एक चूक झाली आणि त्याचे आधार दुसऱ्याच्या खात्याशी लिंक झाले, पण त्याने रक्कम परत केली नाही. इतर कोणालाही कळू नये म्हणून त्याने कॉमन सर्व्हिस सेंटरवर लाच दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाबाबत त्याला नोटीस जारी केली होती. तेव्हा त्याने आम्हाला एक पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पैसे पाठवल्याचा विश्वास व्यक्त केल्या होता, असे पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.