पालिकेचा लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 07:42 PM2019-01-02T19:42:05+5:302019-01-02T19:44:07+5:30
घनश्याम सोपान घोरपडे (४९) याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) अटक केली आहे. २७ वर्षीय बांगडी कारखाना असलेल्या व्यावसायिकाकडे त्याने सहा हजार लाच मागितली होती.
मुंबई - बृहन्मुंबई पालिकेच्या पी उत्तर या वॉर्डच्या कार्यालयात काम करणाऱ्या घनश्याम सोपान घोरपडे (४९) याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) अटक केली आहे. २७ वर्षीय बांगडी कारखाना असलेल्या व्यावसायिकाकडे त्याने सहा हजार लाच मागितली होती.
मालाड येथील लिबर्टी गार्डन येथील पालिकेच्या पी उत्तर वॉर्ड कार्यालयात घोरपडे हा लीगल डिपार्टमेंट विभागात नोटीस क्लार्क म्हणून काम करतो. घोरपडेने २६ डिसेंबरला बांगडी कारखानदारास भेटून तुमच्या विरुद्ध पार्ले कोर्टात केस झाली असून हे प्रकरण मिटविण्याकरिता लाचेची मागणी केली. त्यानुसार २९ डिसेंबरला पडताळणीदरम्यान तक्रारदार बांगडी कारखानदारास तुम्हाला योग्य वाटेल तेवढी रक्कम दोन तीन दिवसात घेऊन या असे सांगितले. दरम्यान तक्रारदाराने एसीबीला तक्रार दाखल केली आणि आज तक्रारदाराकडून ६ हजार रुपये लाच स्वीकारून त्यातील ३ हजार रुपये तक्रादारास घोरपडेने परत केले. यावेळी एसीबीने सापळा रचून ६ हजार रुपये हस्तगत करून आरोपी घोरपडेला ताब्यात घेतले.