बेडखाली ठेवला होता पत्नीचा मृतदेह, वर पती झोपला होता; असा झाला हत्येचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 11:08 AM2021-05-27T11:08:48+5:302021-05-27T11:09:26+5:30
महिलेचा मृतदेह बेडखाली पडून होता आणि बेडवर पती झोपलेला होता. पोलिसांनी पतीला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतलं. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.
उत्तर प्रदेशच्या बरेलीच्या सुभाष नगर भागात एका महिलेच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक लोकांनी पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. असे सांगितले जात आहे की, महिलेचा मृतदेह बेडखाली पडून होता आणि बेडवर पती झोपलेला होता. पोलिसांनी पतीला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतलं. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.
सुभाष नगर रोंधी मिलकमध्ये राहणारे डोरीलालने २०११ मध्ये आपली मुलगी ममताचं लग्न मनोर कुमार साहूसोबत लावून दिलं होतं. लग्नाच्या १० वर्षानंतरही बाळ होत नसल्याने पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होतं. ममताचा भाऊ राकेश कुमारने सांगितलं की, त्यांना सूचना मिळाली होती की, त्याच्या बहिणीचं निधन झालं आहे. त्यामुळे ते करेली गावात पोहोचले. (हे पण वाचा : पत्नीच्या चारित्र्यावर घेतला पतीने संशय; गळ्यावर घातले तीन चार कुऱ्हाडीचे घाव )
राकेश कुमार शेजाऱ्याच्या छतावरून आपल्या बहिणीच्या घरात शिरला तर आतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्याला नेमकं काय झालंय हे समजलं नाही. स्थानिकांनी सांगितलं की, महिलेची डेड बॉडी तिच्या रूममध्ये आढळून आली. महिलेची डेड ब़ॉडी खाली पडली होती आणि बेडवर पती झोपलेला होता.
घटनेनंतर महिलेच्या परिवाराने पतीवर हत्येचा संशय व्यक्त केला. संशयाच्या आधारावर पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस अधिकारी पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यावर कारवाई करणार आहेत. (हे पण वाचा : धूम-धडाक्यात सुरू होतं लग्न, तेव्हाच मंडपात तरूणाची पहिली पत्नी पोहोचली; मग झालं असं काही....)
एसपी सिटी रविंद्र कुमार यांनी सांगितलं की, पोलिसांना एका महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाली होती. त्यानंतर शिवपुरा आणि सुभाष नगर पोलीस करेली गावात पोहोचले. घटनास्थळावरून त्यांनी डेड बॉडी ताब्यात घेतली. आणि पोस्टमार्टमसाठी पाठवली. सध्या पतीला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी केली जात आहे. पोस्टमार्टमनंतर महिलेच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.