बोबड्या भाषेत ६ वर्षीय मुलीने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य, डोळ्यांनी पाहिली होती तिने सगळी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 02:47 PM2021-08-18T14:47:07+5:302021-08-18T14:48:01+5:30

सकाळी घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. यानंतर मुलीने तिच्या बोबड्या भाषेत संपूर्ण घटनेचा खुलासा केला.

UP Bareilly woman murder 6 year old girl solve case police | बोबड्या भाषेत ६ वर्षीय मुलीने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य, डोळ्यांनी पाहिली होती तिने सगळी घटना

बोबड्या भाषेत ६ वर्षीय मुलीने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य, डोळ्यांनी पाहिली होती तिने सगळी घटना

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या बरेलीमद्ये ६ वर्षीय मुलीसमोर करण्यात आलेल्या आईच्या हत्येचा अखेर खुलासा झाला आहे. महिलेच्या दिरानेच तिच्या डोक्यात जड वस्तू मारून तिची हत्या केली होती. हत्येनंतर दीर फरार झाला होता. सकाळी घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. यानंतर मुलीने तिच्या बोबड्या भाषेत संपूर्ण घटनेचा खुलासा केला.

बरेलीच्या शांति विहारमधील ही घटना आहे. इथे मजुरी करून आपलं पोट भरणारे दोन भाऊ राहत होते. मोठा भाऊ इलेक्ट्रिकचं काम करायचा. तो पत्नी विनीता सक्सेना आणि सहा वर्षीय मुलीसोबत राहत होता. तर दुसरा भाऊ आकाश सध्या काही करत नव्हता. (हे पण वाचा : Shocking! मोबाइल जमिनीवर उल्टा ठेवून स्कर्ट घातलेल्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ, तरूणाला अटक)

ही घटना रात्री घडल्याचं सांगितलं जात आहे. मृत विनीता आपल्या सहा वर्षीय मुलीसोबत घरीच होती. रात्री दीर आकाश घरी आला आणि जेवण मागू लागला होता. यावरून दोघांमद्ये काहीतरी वाद झाला. छोट्याशा गोष्टीच्या रागातून दीर आकाशने वरवंट्याने विनीताच्या डोक्यावर अनेकदा वार केले. 

विनीताचा जागीच मृत्यू झाला. आकाश मुलीला दुसऱ्या रूममध्ये बंद करून फरार झाला. सकाळी शेजाऱ्यांनी  या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. सध्या आरोपीचा शोध घेणं सुरू आहे. 

आश्चर्याची बाब म्हणजे सहा वर्षीय मुलीने बोबड्या भाषेत तिने जे बघितलं ते सगळं पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलिसांनी आरोपी दिराचा शोध सुरू केला आहे. तो अजूनही फरार आहे.
 

Web Title: UP Bareilly woman murder 6 year old girl solve case police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.