धक्कादायक! मेहुणीसोबत लग्न करण्याची भावोजीची होती इच्छा, आपल्या चारही मुलींना दिलं विष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 03:36 PM2021-09-18T15:36:43+5:302021-09-18T15:36:58+5:30

मीडिया रिपोर्टनुसार, पोषाल गावातील पुरखारामच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ज्यानंतर त्याच्या मुली आजी-आजोबाकडे राहत होत्या.

Barmer : father gave poison to his 4 daughters for marriage with sali | धक्कादायक! मेहुणीसोबत लग्न करण्याची भावोजीची होती इच्छा, आपल्या चारही मुलींना दिलं विष

धक्कादायक! मेहुणीसोबत लग्न करण्याची भावोजीची होती इच्छा, आपल्या चारही मुलींना दिलं विष

googlenewsNext

राजस्थानच्या बाडमेरमधून एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका निर्दयी बापाने आपल्या चार निष्पाप मुलींचा विष देऊन जीव घेतला. आरोपीने तिन्ही मुलींना किटकनाशक पाजलं आणि पाण्याच्या टाक्यात टाकलं. त्यानंतर स्वत:ही किटकनाशक प्राशन केलं आणि चौथ्या मुलीला घेऊन टाक्यात उडी घेतली. यात त्याच्या चारही मुलींचा वेदनादायी मृत्यू झाला. तर स्थानिकांनी मुलींच्या वडिलांना वाचवलं. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, पोषाल गावातील पुरखारामच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ज्यानंतर त्याच्या मुली आजी-आजोबाकडे राहत होत्या. पुरखाराम याला त्याच्या मेहुणीसोबत लग्न करायचं होतं. शुक्रवारी तो त्याच्या सासरी गेला. तेथून आपल्या चारही मुलींना घरी घेऊन आला. त्यानंतर रात्रीचं जेवण झाल्यावर त्याने त्यांना किटकनाशक पाजलं. नंतर जवळच्याच पाण्याच्या टाकीत त्यांना फेकलं. त्यानंतर स्वत: किटनाशक पिऊन सर्वात लहान मुलीला घेऊन टाकीत उडी मारली. (हे पण वाचा : प्रेयसीने त्याला फोन करून घरी बोलवलं, त्यानंतर जे घडलं ते वाचून चक्रावून जाल)

सासरच्यांना पाठवली सुसाइड नोट

कुटुंबिय आणि स्थानिकांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. लोकांनी मुलींच्या वडिलांना वाचवलं. तेच ९ वर्षीय जीयो, ७ वर्षीय हिना, ३ वर्षीय वशुधर आणि १ वर्षीय लाछी चौघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. गंभीर स्थितीत त्यांच्या वडिलांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.  पुरखारामने हे कृत्य करण्याआधी एका मोबाइल अॅपवर सुसाइड नोट लिहून सासरच्या लोकांना पाठवली होती. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Web Title: Barmer : father gave poison to his 4 daughters for marriage with sali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.