सावधान! चक्क पोलीस अधीक्षकांच्या नावानेच फेक फेसबुक अकाउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 09:05 PM2021-05-03T21:05:23+5:302021-05-03T21:05:51+5:30

Fake Facebook Account : फेक अकाउंटद्वारे लोकांना फसवणे हा नवीन प्रकार नाही

Be careful! Fake Facebook account in the name of Superintendent of Police | सावधान! चक्क पोलीस अधीक्षकांच्या नावानेच फेक फेसबुक अकाउंट

सावधान! चक्क पोलीस अधीक्षकांच्या नावानेच फेक फेसबुक अकाउंट

Next
ठळक मुद्देनागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना जपून करावा व काही गैरप्रकार आढळला तर रत्नागिरी सायबर सेलच्या ८८८८९०५०२२ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रत्नागिरी : जनतेला सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी जनजागृती करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याच नावाने फेसबुकवर फेक अकाउंट काढल्यात आले आहे.


फेक अकाउंटद्वारे लोकांना फसवणे हा नवीन प्रकार नाही. पण याचा फटका खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनाही बसला आहे. त्यांच्या नावाने कोणीतरी फेसबुक अकाऊंट काढल्याचे सोमवारी उघड झाले आहे. 
या नावाने जर रिक्वेस्ट आली तरी कोणीही स्वीकारू नये, असे आवाहन डॉ. गर्ग यांनी केले आहे. नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना जपून करावा व काही गैरप्रकार आढळला तर रत्नागिरी सायबर सेलच्या ८८८८९०५०२२ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Be careful! Fake Facebook account in the name of Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.