सावधान! लॉकडाऊनकाळात दहशतवादी, नक्षली संधीच्या शोधात; बेरोजगारांनो पडू नका फंदात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 04:59 PM2020-04-22T16:59:10+5:302020-04-22T17:05:26+5:30

नक्षलवाद्यांपासून ते दहशतवादी संघटनांकडे त्यांनी यासाठी त्यांचे स्लीपर सेल्स सक्रिय करण्यास सुरूवात केली आहे.

Be careful! in lockdown, Naxals, Terrorists in search of opportunities; Don't fall into the trap of the unemployed pda | सावधान! लॉकडाऊनकाळात दहशतवादी, नक्षली संधीच्या शोधात; बेरोजगारांनो पडू नका फंदात

सावधान! लॉकडाऊनकाळात दहशतवादी, नक्षली संधीच्या शोधात; बेरोजगारांनो पडू नका फंदात

Next
ठळक मुद्दे लॉकडाऊननंतर ते बेरोजगार तरुणांची भरती करण्यात सक्षम होतील, असा विश्वास या संघटनांचा आहे. जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तैयबा काश्मीरमधील आपली मुळे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे दहशतवादी संघटना आणि नक्षलवाद्यांनीही अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाचा फायदा उठविण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांपासून ते दहशतवादी संघटनांकडे त्यांनी यासाठी त्यांचे स्लीपर सेल्स सक्रिय करण्यास सुरूवात केली आहे.


लॉकडाऊननंतर ते बेरोजगार तरुणांची भरती करण्यात सक्षम होतील, असा विश्वास या संघटनांचा आहे. गुप्तचर यंत्रणेच्या अशा बातम्यांमुळे सुरक्षा यंत्रणांचे कान टवकारले आहेत. अशी  माहिती मिळते की, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तैयबा काश्मीरमधील आपली मुळे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.


उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही अशाच प्रकारच्या नक्षलवाद्यांच्या सक्रियतेचा आढावा घेण्यात येत आहे. छत्तीसगड, झारखंड, ओडिसा यासारख्या राज्यात नक्षलवाद्यांनी नवीन भरतीसाठी खेड्यांमध्ये संपर्क वाढविला आहे. सीआरपीएफ या सर्व घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. सुरक्षा दलांचे डीआयजी इंटेलिजेंस एम. दिनाकरन म्हणतात, सुरक्षा दलांनी तिथे घट्ट पकड केली आहे. सतत कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे आता मोडले आहे.

लॉकडाउनच्या नवीन परिस्थितीत ते नवीन भरती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे गेली दोन वर्षे नक्षल क्षेत्रात नवीन नक्षलवादी भरती जवळपास रेंगाळली होती.


काश्मीरमध्येही प्रयत्न केले जात आहेत
कलम  ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये आता लॉकडाऊन झाला होता. यामुळे दहशतवाद्यांच्या भरती प्रक्रियेस जास्त चालना माळली नव्हती. जम्मू-काश्मीरचे  डीजीपी दिलबाग सिंह म्हणतात की, दहशतवादी आता नवीन सदस्यांची भरती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दोन-तीन वर्षांत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरूद्ध अनेक मोठ्या कारवाया केल्यात. स्थानिक पातळीवरील दहशतवाद्यांनी अनेक तरुणांची दिशाभूल केली आणि त्यांना त्यांच्या संघटनेत समाविष्ट केले.

सुरक्षा दलाने १ ६० अतिरेकी ठार मारले तेव्हा त्यांनी स्थानिक पातळीवर नवीन भरती करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केली. सुमारे १४० स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले. यातील बरेच तरुण परत आले, बरेच ठार झाले. आता हे दहशतवादी कोरोनाच्या लॉकडाऊनचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Be careful! in lockdown, Naxals, Terrorists in search of opportunities; Don't fall into the trap of the unemployed pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.