घरकामाचे पैसे मागितले म्हणून मारहाण करत घेतले चावे; मीरारोडमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 05:29 PM2021-10-19T17:29:25+5:302021-10-19T17:30:02+5:30
कामाचे पैसे मागण्यास गेली असता अकलीने तिला शिवीगाळ व धक्काबुक्की सुरु केली.
मीरारोड - मीरारोडच्या गीता नगर फेज ३ , रामरहीम पुढील चाळ क्र . १० मध्ये राहणाऱ्या माफजा मंडल यांनी शेजारी राहणाऱ्या अकली मंडल हिच्या जागी एक महिना घरकाम केले होते व त्याचे पैसे अकली देत नव्हती. माफजा हि कामाचे पैसे मागण्यास गेली असता अकलीने तिला शिवीगाळ व धक्काबुक्की सुरु केली.
भांडण सोडवण्यासाठी माफजाचा जावई मोहम्मद मुल्ला (२७) व नातलग अब्दुल सिध्दीक गेले असता अकली हिने त्यांना शिविगाळ केली व तिचा पती अबुबकर ने दोघांना मारहाण केली . अबूबकरच्या भावाने मोहम्मदचा गालाचा तर अबूबकरचा मुलगा नाजीबुल याने अब्दुलच्या बरगडीला चावा घेवून बेदम मारले . या प्रकरणी नया नगर पोलिसांनी शनिवारी अबुबकर सह त्याचा भाऊ , मुलगा नाजीबुल व अकली विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.