मूकबधिर सफाई कामगारास मारहाण; कामगारांनी मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर केले निषेध आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 05:06 PM2022-02-11T17:06:34+5:302022-02-11T17:07:14+5:30

Beating of deaf and dumb cleaning workers : जखमी कामगारावरशहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Beating of deaf and dumb cleaning workers; Workers staged a protest at the entrance of the corporation headquarters | मूकबधिर सफाई कामगारास मारहाण; कामगारांनी मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर केले निषेध आंदोलन

मूकबधिर सफाई कामगारास मारहाण; कामगारांनी मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर केले निषेध आंदोलन

Next

नितिन पंडीत

भिवंडी - महापालिकेच्या प्रभाग समिती एक मधील वार्ड क्रमांक १० कॅबिन क्रमांक २७ येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले मुकबधिर कर्मचारी किशोर बळीराम पाटील हे सकाळी आपल्या कर्तव्यावर रूजू असताना त्याच विभागातील राहणारा यूनूस खान याने सफाई कामगार किशोर पाटील यांचेवर जिवघेणा हल्ला केला असल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. जखमी कामगारावरशहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

या घटनेचा निषेध म्हणून भिवंडी महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी कामगार युनियनच्या माध्यमातून दुपारी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन केले. या आंदोलनादरण्यात कामगाराला मारहाण करणाऱ्या इसमावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यास अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. तसेच गुन्हा दाखल करण्यास जर टाळाटाळ झाली तर कामगार सोमवार पासून कामबंद आंदोलन करतील असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेत प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली.

कर्मचाऱ्यांनी मुख्यालय प्रवेशद्वारावर केलेल्या आंदोलनादरम्यान महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेत पोलीस प्रशासनाशी आपली चर्चा झाली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्यासंदर्भातील लेखी निवेदन देखील आपण पोलीस प्रशासनाला देणार आहोत त्यामुळे कामगारांनी कामबंद आंदोलन करून नये अशा सूचना उपस्थित कर्मचाऱ्यांना दिल्या असून सफाई कामगाराला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध आयुक्त देशमुख यांनी या आंदोलनादरम्यान नोंदविला.

Web Title: Beating of deaf and dumb cleaning workers; Workers staged a protest at the entrance of the corporation headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.