पती पत्नीचे भांडण साेडविणाऱ्या पाेलिसाला मारहाण; एकास अटक

By मुरलीधर भवार | Published: April 11, 2023 05:30 PM2023-04-11T17:30:43+5:302023-04-11T17:34:32+5:30

रविवारच्या रात्री पाेलिस नियंत्रण कक्षातून काेळसवाडी पाेलिस ठाण्यात फाेन आला.

Beating the policeman who went to settle the quarrel between husband and wife | पती पत्नीचे भांडण साेडविणाऱ्या पाेलिसाला मारहाण; एकास अटक

पती पत्नीचे भांडण साेडविणाऱ्या पाेलिसाला मारहाण; एकास अटक

googlenewsNext

कल्याण - शहराच्या पूर्व भागातील विजयनगरमध्ये राहणाऱ्या पती पत्नीचे भांडण साेडविण्यासाठी गेलेल्या पाेलिसालाच मारहाण करण्यात आली आहे. पाेलिसाला मारहाण करणाऱ्या महेश माने याला काेळसेवाडी पाेलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा केल्याच्या आराेपाखाली महेश मानेच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाण झालेल्या पाेलिसाचे नाव नागेशनाथ घुगे असे आहे.

रविवारच्या रात्री पाेलिस नियंत्रण कक्षातून काेळसवाडी पाेलिस ठाण्यात फाेन आला. विजयनगर येथील एका साेसायटीत एक पती पत्नीला मारहाण करीत आहे. त्याठिकाणी नागेशनाथ घुगे यांना जाण्यासाठी सांगण्यात आले. त्यांच्यासाेबत अन्य एक पाेलिस सहकारीही हाेता. घुगे हे घटनास्थळी पाेहचले. तेव्हा महेश माने हा त्याच्या पत्नीला मारहाण करीत हाेता. तेव्हा घुगे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता माने याने तुम्हा मला सांगणारे काेण असा सवाल केला. माने पाेलिसांनाच मारहाण करीत घराबाहेर फरफरट नेले. इमारतीतील वाहनतळावर घुगे यांना लाेटून दिले. यावेळी घुगे यांन दुखापत झाली. घुगे यांनी पाेलिस ठाण्यात फाेन करुन घडला प्रकार सांगितला असता पाेलिस ठाण्यात आणखीन पाेलिस पाठविले गेले. मानेला ताब्यात घेऊन त्याला पाेलिस ठाण्यात आणले गेले. त्याला अटक केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beating the policeman who went to settle the quarrel between husband and wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.