पूर्ववैमानस्यातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: April 6, 2023 07:29 PM2023-04-06T19:29:05+5:302023-04-06T19:29:18+5:30
विकास कुमार तारकेश्वर राम (वय २०, रा . बोऱ्हाडे वस्ती, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
पिंपरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांना मारहाण केली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बोऱ्हाडे वस्ती, मोशी येथे बुधवारी (दि. ५) दुपारी पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली.
विकास कुमार तारकेश्वर राम (वय २०, रा . बोऱ्हाडे वस्ती, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुस्तकीन खान आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तकीन खान याचे फिर्यादीशी मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून खान याने त्याच्या दोन साथीदारांसोबत येऊन फिर्यादीला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याचबरोबर फिर्यादीचा चुलत भाऊ पिंटू कुमार याला देखील लोखंडी रॉड आणि फायबरच्या पाईपाने मारून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे