कंपनीतील काम सोडल्याचा राग मनात धरून कर्मचाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 07:43 PM2019-07-24T19:43:34+5:302019-07-24T19:46:03+5:30

कंपनीतील काम सोडले याचा राग मनात धरून शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

beating up to worker due to anger leaving work from company | कंपनीतील काम सोडल्याचा राग मनात धरून कर्मचाऱ्याला मारहाण

कंपनीतील काम सोडल्याचा राग मनात धरून कर्मचाऱ्याला मारहाण

Next

लोणी काळभोर : कंपनीतील काम सोडले याचा राग मनात धरून दोन मालकांसह पाच साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उरळी देवाची दूरक्षेत्राच्या हद्दीत घडली आहे. 
          याप्रकरणी युसूफ मोहम्मद शेख ( वय ३६, रा एम एम रेसिडेन्सी, श्रीकृष्ण हौसिंग सोसायटी, केशव नगर, मुंढवा, पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एशिया एस एस कंपनी, चंदननगर इंडस्ट्रीयल एरिया. खराडी, पुणे चे मालक  ईस्माईल मेहबुब शेख, हिदायत मेहबुब शेख ( रा. वडगांव शेरी, पुणे ) व त्यांच्या पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बडगुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युसूफ हे गेल्या १४ दिवसांपासून प्युरोव्हेट सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड शेवाळवाडी, ऊरूळी देवाची या कंपनीत सिनियर सर्व्हिस मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते एशिया एस एस कंपनीमध्ये सर्व्हिस मॅनेजर म्हणून काम करत होते.
         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ( दि.२३ ) रोजी फिर्यादीवरुन प्युरोव्हेट सिस्टीम प्रा. लिमिटेड  कंपनीत नेहमीप्रमाणे काम करत होते. दुपारी १ - ३२ वाजण्याच्या सुमारास ते पूर्वी काम करत असलेल्या एशिया एस एस कंपनी कंपनीचे मालक ईस्माईल शेख यांनी हिदायत  शेख व इतर पाचजण आले. ईस्माईल व मेहबूब यांनी तु आमच्या येथील काम का सोडले ? तुला आता आम्ही सोडणार नाही. असे म्हणून सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण , शिवीगाळ , दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी युसूफ शेख यांनी  उरळी देवाची दूरक्षेत्रात जावून फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राणे हे करत आहेत. 

Web Title: beating up to worker due to anger leaving work from company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.