गुन्हे मालिका पाहून बनला चोर; बेरोजगारीमुळे उचलले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 11:55 AM2022-02-15T11:55:34+5:302022-02-15T11:56:07+5:30
तक्रारदार जिग्नेश मेहता यांच्या १४ व्या मजल्यावरील कार्यालयात २९ जानेवारी रोजी १२ किलो चांदीचे दागिने व ७ लाखांची रोकड चोरली
मुंबई : कोरोनामुळे नोकरी गेली. अशात, गुन्हे मालिका पाहून तरुणाने चोरीचा मार्ग अवलंबल्याचे दादर पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले. बळवंत गुप्ता असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून ८ किलो चांदीचे दागिने, सव्वापाच लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
तक्रारदार जिग्नेश मेहता यांच्या १४ व्या मजल्यावरील कार्यालयात २९ जानेवारी रोजी १२ किलो चांदीचे दागिने व ७ लाखांची रोकड चोरली. गुप्ताने सीसीटीव्हीचे डीव्हीआर काढून नेला. पण पोलिसांना एका सीसीटीव्हीत बुरखाधारी व्यक्ती दिसून आल्याने संशय आला. पोलिसांनी दहा पोलीस ठाण्यांचे १५० सीसीटीव्ही तपासून पनवेलमधून गुप्ताला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश मुकुटराव, सागर शिवलकर, प्रमोद आहिरे, शरद काकड, यांनी ही कारवाई केली.