'केबीसी'ची लखपती बनायला गेली अन् पैसेच गमवून बसली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:40 PM2019-09-30T16:40:19+5:302019-09-30T16:55:04+5:30

फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

To become a millionaire went to KBC and wasted money | 'केबीसी'ची लखपती बनायला गेली अन् पैसेच गमवून बसली

'केबीसी'ची लखपती बनायला गेली अन् पैसेच गमवून बसली

Next
ठळक मुद्देकांदिवलीत राहणाऱ्या अमरुनिसा अब्दुल कलाम शेख (२५) यांची यात फसवणूक झाली आहे. शेख यांनी पैसे नसल्याचे सांगताच, त्यांनी बोलण्यात गुंतवून त्यांना अर्धे पैसे भरण्यास सांगितले.

मुंबई - लखपती होण्याच्या नादात गृहिणीने ८३ हजार रुपये गमावल्याची घटना कांदिवलीत उघडकीस आली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
कांदिवलीत राहणाऱ्या अमरुनिसा अब्दुल कलाम शेख (२५) यांची यात फसवणूक झाली आहे. त्यांच्या मोबाइलमध्ये असलेल्या आयएमओ अ‍ॅपवर केबीसी ऑफिसर नावाने कॉल आला. संबंधित कॉल धारकाने त्यांना ३५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून आधार कार्ड, पॅन कार्ड पाठविण्यास सांगितले. शेख यांचाही त्याच्यावर विश्वास बसला. सावज जाळयात अडकल्याचे लक्षात येताच, प्रोसेसिंग फीज म्हणून १८ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून पैसे भरले. पुढे २५ हजार रुपये कराची रक्कम भरल्यानंतर खात्यात पैसे जमा होतील, असे सांगितले. तेही पैसे त्यांनीही भरले. त्यानंतर, त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या नावाने कॉल आला. त्याने लॉटरीच्या कागदपत्रांवर दोन प्रकारे सह्या कराव्या लागतात. एकात पैसे कट होतात, तर एकात होत नाहीत, असे सांगत आणखीन १ लाख भरण्यास सांगितले. शेख यांनी पैसे नसल्याचे सांगताच, त्यांनी बोलण्यात गुंतवून त्यांना अर्धे पैसे भरण्यास सांगितले. अशा प्रकारे त्यांनी एकूण ८३ हजार लॉटरीच्या नादात जमा केले. मात्र, यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख यांनी कांदिवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

Web Title: To become a millionaire went to KBC and wasted money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.