धक्कादायक! मुलगा होणार नसल्यामुळे पतीने केला पत्नीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 03:41 AM2021-02-07T03:41:11+5:302021-02-07T07:48:52+5:30

बीडमधील घटना; दुसऱ्या विवाहास विरोध केल्याने मारहाण

in beed Husband kills wife for unable to give son amp | धक्कादायक! मुलगा होणार नसल्यामुळे पतीने केला पत्नीचा खून

धक्कादायक! मुलगा होणार नसल्यामुळे पतीने केला पत्नीचा खून

Next

बीड : कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर एकुलता एक मुलगा दगावला. आता वंशाला दिवा हवा म्हणून दुसरे लग्न करण्यावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणातून पतीने पत्नीचे पाय बांधून तिला बेदम मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाला. हा प्रकार शुक्रवारी रात्री औरंगपूर शिवारात घडला. दरम्यान, आरोपी पती महादेव आसाराम रेड्डे यास पोलिसांनी अटक केली आहे.

राधा महादेव रेड्डे असे मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. दहा वर्षांपूर्वी राधा यांचा विवाह गेवराई तालुक्यातील इरगाव येथील महादेव आसाराम रेड्डे (३६) याच्यासोबत झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. मात्र, आजारपणामुळे ८ वर्षांच्या मुलाचा २ वर्षांपूर्वी मृत्यू झाला. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यामुळे आता मुलगा होणार नसल्याने दुसरी बायको करावी लागेल, असा तगादा महादेवने पत्नी राधाकडे लावला. यावर दुसरे लग्न करण्यापेक्षा मुलगा होण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करून घेऊ असे तिने सुचविले. यासाठी बीडच्या डॉक्टरांनी तपासण्या करून ३० हजार रुपये खर्च सांगितला. एवढे पैसे काेठून आणायचे यावरून महादेवने रुग्णालयातच राधाला शिवीगाळ करून भांडण केले.

घरी आल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी रात्री ते ५ फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास महादेवने पत्नी राधा हिचे हातपाय बांधून लाकडी दांड्याने मारहाण केली व घरातून निघून गेला. सकाळी जखमी राधाने शेजारच्या महिलेला हाक मारून दवाखान्यात नेण्याची विनंती केली. दवाखान्यात घेऊन जातानाच राधाचा मृत्यू झाला. 

ही माहिती कळताच तिच्या माहेरच्या लोकांनी गेवराई पोलिसांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी महादेव रेड्डे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मदतीसाठी कोणीच आले नाही
 आरोपी महादेव आसाराम रेड्डे हा औरंगपूर येथील एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करत होता. 
आजूबाजूला शेजारी कोणी नसल्यामुळे मारहाण झाल्यानंतरदेखील सोडविण्यासाठी कोणी येणे शक्य नव्हते.

Web Title: in beed Husband kills wife for unable to give son amp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.