मैत्रिणीवर अत्याचार करून काढले अश्लील फोटो; बेगमपुरा पोलिसांकडून आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 17:43 IST2018-07-12T17:38:17+5:302018-07-12T17:43:39+5:30
मैत्रिणीवर अत्याचार केल्यानंतर तिची अश्लील छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करून अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली.

मैत्रिणीवर अत्याचार करून काढले अश्लील फोटो; बेगमपुरा पोलिसांकडून आरोपीस अटक
औरंगाबाद : मैत्रिणीला मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्यानंतर तिची अश्लील छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करून अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार नोव्हेंबर २०१५ ते जून २०१७ या कालावधीतील आहे.
आरेफ युनूस पटेल (२६, रा. जटवाडा रोड), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, नोव्हेंबर २०१५ मध्ये पीडिता टी.व्ही. सेंटर येथे असताना आरोपी दुचाकीने तिच्याजवळ आला आणि चक्कर मारून येऊ, असे म्हणून दुचाकीवर बसवून तो तिला आरेफ कॉलनीतील मित्राच्या खोलीवर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर तेथे बळजबरीने अत्याचार केला. यावेळी तिची अश्लील छायाचित्रे काढली.
ही बाब कोणाला सांगितल्यास समाजात तुझी बदनामी करीन, अशी धमकी त्याने एका लॉजवर आणि त्याच्या जटवाडा रोडवरील घरी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. त्याला घाबरून पीडितेने पोलिसांतही तक्रार दिली नव्हती. दरम्यान, पिडीतेने बुधवारी बेगमपुरा ठाण्यात तक्रार दिली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.