शिरच्छेद, अर्धवट जळालेले महिला आणि पुरुषाचा मृतदेह सापडले, गांधीनगरमध्ये उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 01:51 PM2022-06-04T13:51:55+5:302022-06-04T13:53:48+5:30
Double Murder Case : दोघांवर धारदार शस्त्रांनी वार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गुजरातमधील गांधीनगरच्या अडालज येथे एक महिला आणि पुरुषाचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. दोघांचेही मृतदेह जाळण्यापूर्वी शिर शरीरापासून वेगळे केल्याचे दिसत होते. दोघांवर धारदार शस्त्रांनी वार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रत्यक्षात अडालज गावाच्या काठावर नर्मदा कालव्याजवळ एका मोकळ्या जागेत एका महिला आणि पुरुषाचे अर्धवट जळालेले मृतदेह पडले होते. माहिती मिळताच पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात तपास केला असता हात, डोकं व शरीराचे इतर भाग वेगळे आढळून आले. या दोघांचे वय 25 ते 40 वर्षांच्या दरम्यान असल्याचे समजते. पोलीस श्वानपथक आणि एफएसएलच्या पथकाच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला आहे. हे दोघे पती-पत्नी होते, तर गेल्या महिनाभराची बेपत्ता तक्रार होती असावी, याचाही तपास पोलीस करत आहेत. बेपत्ता लोकांची माहिती गोळा केली जात आहे. यासोबतच अहमदाबाद आणि गांधीनगर भागात त्याच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंवरून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.