प्रेयसीची डिमांड लय भारी, तिच्यासाठी सुरू केली चोरी; सत्य ऐकून पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:10 AM2022-02-15T11:10:41+5:302022-02-15T11:11:18+5:30

चारही चोर हे प्रतिष्ठित कुटुंबातील असून, सर्वांना महागडी दुचाकी, महागडा मोबाइल आणि उच्च प्रतीचे कपडे परिधान करण्याची हौस जडली होती.

Beloved's demand rhythm heavy, stealing started for her, Police Arrested Accused | प्रेयसीची डिमांड लय भारी, तिच्यासाठी सुरू केली चोरी; सत्य ऐकून पोलिसही चक्रावले

प्रेयसीची डिमांड लय भारी, तिच्यासाठी सुरू केली चोरी; सत्य ऐकून पोलिसही चक्रावले

Next

भगवान वानखेडे

बुलडाणा : जन्मत: कोणीच गुन्हेगार नसतो. त्याला गुन्हेगार बनविते ती परिस्थिती. आतापर्यंत हे वाक्य अनेकांच्या कानावर पडले असेल. मात्र, चक्क प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दुचाकी, मोबाइल चोरी करून कुणी गुन्हेगार बनत असेल तर काय?. होय, हे खरे आहे. चक्क प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी एकाने चोरीचा मार्ग पत्करला.

काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेगाव शहरातील शेख शाहरुख शेख फिरोज, शेख मोबीन शेख हारुन, अमान खान अस्लम खान, मुन्शिफ खान अल्ताफ खान या दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळून मुद्देमाल जप्त केला होता. यातील शेख शाहरुख शेख फिरोज याने प्रेयसीच्या डिमांड पूर्ण करण्यासाठी चोरी करीत असल्याची कबुली पोलिसांना दिली, तेव्हा तेही चक्रावले. प्रेम आंधळे असतेच, पण ते गुन्हेगारही बनवित असल्याचे यातून पुढे आले. 

हायटेक लाईफस्टाईल जगण्याची हौस
चारही चोर हे प्रतिष्ठित कुटुंबातील असून, सर्वांना महागडी दुचाकी, महागडा मोबाइल आणि उच्च प्रतीचे कपडे परिधान करण्याची हौस जडली होती. ही लाईफस्टाईल जपण्यासाठी चोरी हा एकमेव मार्ग त्यांना दिसला.

Web Title: Beloved's demand rhythm heavy, stealing started for her, Police Arrested Accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.