हॉटेलच्या रूममधून येत होता पत्नीचा आवाज, पतीने तिला बोलवलं तर उघड झालं तिचं सत्य....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 12:29 PM2021-06-03T12:29:19+5:302021-06-03T12:29:56+5:30

याप्रकरणी हॉटेलचा मालक राजदीप घोष, हॉटेल मॅनेजर विपुल कर आणि इतर एका कर्मचाऱ्याला कंचनगंगा हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. 

Bengal Alipurduar hotel room wife voice unknown caught sex racket exposed | हॉटेलच्या रूममधून येत होता पत्नीचा आवाज, पतीने तिला बोलवलं तर उघड झालं तिचं सत्य....

हॉटेलच्या रूममधून येत होता पत्नीचा आवाज, पतीने तिला बोलवलं तर उघड झालं तिचं सत्य....

googlenewsNext

बंगालच्या अलीपूरद्वार शहरात एका पतीने हॉटेलच्या रूममध्ये जाऊन आपल्या पत्नीला एका दुसऱ्याच व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडलं आहे. या घटनेची माहिती परिसरात आगीसारखी पसरली. त्यानंतर हॉटेलबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि बाहेर मोठा गोंधळ सुरू होता.
ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता अलीपूरद्वारच्या चौपाटीवरील एक एलीट हॉटेलमध्ये घडली. स्थानिक लोकांच्या गोंधळामुळे आणि घटनेची माहिती मिळताच अलीपूरद्वार पोलीस स्टेशनमधून मोठ्या प्रमाणात पोलीस दल घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी स्थिती सांभाळली. पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, याप्रकरणी हॉटेलचा मालक राजदीप घोष, हॉटेल मॅनेजर विपुल कर आणि इतर एका कर्मचाऱ्याला कंचनगंगा हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. 

पकडली गेल्यावर आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीने तिला हॉटेलमध्ये पाठवलं होतं. महिलेने दावा केला आहे की, तिच्या पतीनेच तिला हॉटेलच्या रूममध्ये अज्ञात व्यक्तीसोबत जाण्यास आणि अश्लीस फोटो क्लीक फोटो करून देण्यास सांगितले होते. 

महिलेने सांगितले की, तिच्या पतीने त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून पैसे मागण्याची आयडिया दिली होती. पण त्या व्यक्तीला याबाबत आधीच माहिती होती. तो बऱ्याच वर्षापासून हेच काम करत होता. महिलेच्या पतीचं नाव समीर दास आहे. तो मजुरी करून पैसे कमावतो.

समीरने सांगितलं की, महिलेच्या या कामामुळे घरात नेहमीच भांडणं होत होती. समीर म्हणाला की मी बऱ्याच दिवसांपासून तिचे हे कारनामे बघत होतो. आज सकाळी जेव्हा मी घरातून निघालो तेव्हा मी तिचा पाठलाग केला. नंतर मी तिला एक हॉटेलमध्ये जाताना पाहिलं. 

समीरनुसार, यानंतर त्याने त्याच्या मित्रांना फोन करून हॉटेलसमोर बोलवलं. नंतर ते हॉटेलमध्ये गेले. एका रूममधून त्याला त्याच्या पत्नीचा आवाज आला. त्यानंतर त्याने पत्नीला बाहेर येण्यास सांगितले. तेव्हा एक अज्ञात व्यक्ती बाहेर आली. 
हॉटेल मॅनेजरच्या मदतीने ती व्यक्ती तेथून फरार होण्यास य़शस्वी झाली. अलीपूरद्वार पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सांगितले की याप्रकरणी तीन लोकांना अटक करण्यात आली आहे.  तसेच पुढील चौकशी केली जात आहे. 

स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले की, या हॉटेलवर नेहमीच असे आरोप होत राहतात. इथे अशाप्रकारचे अवैध कामे नेहमीच होत असतात.  ज्यावरून हॉटेलच्या मालकाला अनेकदा इशाराही देण्यात आला आहे. पण तरी त्याने काही ऐकलं नाही.
 

Web Title: Bengal Alipurduar hotel room wife voice unknown caught sex racket exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.