Arpita Mukherjee : "आम्हाला अंधारात ठेवून अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या बंगल्यावर जायची"; ड्रायव्हरने केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 03:15 PM2022-07-31T15:15:10+5:302022-07-31T15:26:01+5:30

Arpita Mukherjee : अर्पिता मुखर्जीचा ड्रायव्हर प्रणव भट्टाचार्य यांनी दावा केला आहे की, अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या नाकतला येथील घरी रात्री राहायची.

bengal ssc scam partha chatterjee used to spend the night at home with Arpita Mukherjee driver revealed | Arpita Mukherjee : "आम्हाला अंधारात ठेवून अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या बंगल्यावर जायची"; ड्रायव्हरने केली पोलखोल

Arpita Mukherjee : "आम्हाला अंधारात ठेवून अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या बंगल्यावर जायची"; ड्रायव्हरने केली पोलखोल

googlenewsNext

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) यांच्यातील संबंधांबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहेत. आता अर्पिता मुखर्जीचा ड्रायव्हर प्रणव भट्टाचार्य यांनी दावा केला आहे की, अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या नाकतला येथील घरी रात्री राहायची. मात्र, अर्पिता तिच्या हालचालींबाबत ड्रायव्हरना अंधारात ठेवत असे. प्रणव भट्टाचार्य याने दिलेल्या माहितीनुसार, पार्थ चॅटर्जीने त्याला अर्पिता मुखर्जीसाठी नियुक्त केले होते. प्रणव अर्पिता मुखर्जीची होंडा सिटी चालवायचा. 

व्हाईट मर्सिडीज आणि ब्लॅक ऑडी गेल्या 3-4 महिन्यांपासून गायब असल्याचा धक्कादायक खुलासा प्रणव भट्टाचार्य याने केला आहे. ही वाहने कुठे गेली याची माहिती नसल्याचं देखील  सांगितलं. ईडीने प्रणव भट्टाचार्य यांचा मोबाईल जप्त केला असून तो परत केलेला नाही. अर्पिता वेगवेगळ्या कारसाठी वेगवेगळे ड्रायव्हर वापरत असल्याचा दावाही केला. प्रणव भट्टाचार्य हा कल्याण धार यांना ओळखतो आणि ईडीचे अधिकारी या इंटरनेट कंपनीच्या संचालकांपैकी एक असलेल्या कल्याण धरचा शोध घेत आहेत.

पार्थ किंवा अर्पिता एकमेकांच्या फ्लॅटवर जायचे. त्य़ांना सोडून परत यायचो कारण त्याला तशा सूचना दिल्या जात होत्या. अर्पिताच्या नावावर इतरही अनेक गाड्या आहेत, पण होंडा सिटीशिवाय दुसरी कार चालवण्याची परवानगी नव्हती असं देखील प्रणव भट्टाचार्यने सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पार्थ चॅटर्जीला ईडीने अटक केली केली आणि चॅटर्जीची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या घरांवर छापेमारी केली. यात आतापर्यंत 50 कोटींहून अधिकची रोख आणि अनेक किलो सोने सापडले आहे.

आधी सरकारी नोकरी सोडली मग 'पती'; छोट्या सिनेमात काम करणारी अर्पिता मुखर्जी 'अशी' झाली 'धनकुबेर'

ईडीच्या पथकाने 55 कोटींहून अधिकचा काळा पैसा जप्त केला आहे.फ्लॅटमधून सुमारे 30 कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. यासोबतच दागिने आणि पाच किलो सोनेही सापडले आहे. सोन्याची किंमत 4.31 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत. ईडीला अर्पिता मुखर्जीच्या टालीगंजमधील फ्लॅटमधून 21 कोटी रुपये मिळाले होते. पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना अटक करण्यात आली असून, दोघांना 3 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. 
 

Web Title: bengal ssc scam partha chatterjee used to spend the night at home with Arpita Mukherjee driver revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.