अबब! कुक, ड्रायव्हर, माळी होते कंपन्यांचे संचालक; पगार हजारात तर मालमत्ता कोटीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 12:43 PM2022-09-25T12:43:17+5:302022-09-25T12:44:03+5:30

८ जून २०२२ रोजी कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, सौमेन नंदी विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य, सीबीआयने पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांवर कथित अनियमिततेसाठी गुन्हा दाखल केला होता.

Bengal Teacher Recruitment Scam: Cooks, drivers, gardeners were directors of companies; Salary in thousands and assets in crores | अबब! कुक, ड्रायव्हर, माळी होते कंपन्यांचे संचालक; पगार हजारात तर मालमत्ता कोटीत

अबब! कुक, ड्रायव्हर, माळी होते कंपन्यांचे संचालक; पगार हजारात तर मालमत्ता कोटीत

Next

कोलकाता- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपींची १०३.१० कोटींची मालमत्ता आतापर्यंत तात्पुरती जप्त केली आहे. या घोटाळ्यात बंगालचे तत्कालीन शिक्षणमंत्री ते कुलगुरू ते स्वयंपाकी यांचा सहभाग समोर आला आहे. पडद्याआडून डाव रचणाऱ्या अनेक सत्तेतील नेत्यांचीही नावे यात जोडली गेली आहेत. तृणमूल काँग्रेसचे (TMC) माजी मंत्री पार्थ चॅटर्जी, त्यांच्या जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी, तृणमूलचे आमदार माणिक भट्टाचार्य आणि शिक्षक नियुक्ती समितीचे सदस्य आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी अशा अनेकांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय पैशांची हेराफेरी करणाऱ्या कंपन्यांचाही सापळा रचून तपास सुरू आहे.

बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच उत्तर बंगाल विद्यापीठाचे कुलगुरू आणि WB बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचे (WBBSE) माजी अध्यक्ष सुवीरेश भट्टाचार्य यांना CBI ने अटक केली. २३ जुलै रोजी ईडीच्या अटकेनंतर पार्थ चॅटर्जी आता सीबीआयच्या ताब्यात आहे तर सीबीआयने माजी सल्लागार शांती प्रसाद सिन्हा, पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग (WBSSC) बोर्डाचे अध्यक्ष शोक कुमार साहा आणि WBBSE चे माजी अध्यक्ष कल्याणमय गांगुली यांना अटक केली आहे. या घोटाळ्यात प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मध्यस्थांकडून सुमारे ७ ते ८ लाख रुपये उकळण्यात आले.

पैशाची हाव आणि भ्रष्टाचाराची टोळी
८ जून २०२२ रोजी कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, सौमेन नंदी विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य, सीबीआयने पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांवर कथित अनियमिततेसाठी गुन्हा दाखल केला होता. सहाय्यक शिक्षकांच्या निवडीत एफआयआर नोंदवला. ईडीने आपल्या आरोपपत्रात चंदन मंडलच्या पदाधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा उल्लेख केला आहे, ज्या अंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी खूप पैसे घेतले गेले.

सर्व पुरावे पार्थ चॅटर्जी यांच्याकडे बोट दाखवतात. सखोल तपासानंतर ईडीने अर्पिता मुखर्जी आणि सहा कंपन्यांवर आरोपपत्र सादर केले आहे - अचे एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, अनंत टेक्सफॅब प्रायव्हेट लिमिटेड, सिम्बायोसिस मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंट्री इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, व्ह्यूमोर हायराईज प्रायव्हेट लिमिटेड आणि एपीए यूटिलिटी सर्विसेज उल्लेख केला आहे.

कुक, ड्रायव्हर, माळी संचालक झाले
पार्थ चॅटर्जी यांनी कोणत्याही कंपनीचा मालक होण्यास नकार दिला. मात्र, ईडीच्या म्हणण्यानुसार, पार्थ चॅटर्जीच्या ताब्यात किमान चार कंपन्या होत्या आणि एकामध्ये तो मनोज जैनच्या मदतीने डमी संचालक होता. मनोज जैन हे चॅटर्जी यांच्या जवळचे असल्याचं ईडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. अंतिम गोस्वामी यांनी मनोज जैन यांच्या घरी ३००० मासिक पगारावर स्वयंपाकी ठेवला होता. ऑक्टोबर २०२१ पर्यंत त्यांनी तिथे काम केले आणि तोपर्यंत त्याचा पगार ८००० होता. जुलैमध्ये ईडीच्या तपासात तो जमीरा सनशाईन लिमिटेड कंपनीत संचालक असल्याची माहिती पडलं. साक्षीदार कल्याण धर यांनी ईडीला दिलेल्या जबाबात सांगितले की त्यांची मेहुणी अर्पिता मुखर्जी हिने त्यांना १८००० रुपये मासिक पगारावर चालक म्हणून भरती केले होते. तो देखील अनेक कंपन्यांमध्ये संचालक आहे. 

Web Title: Bengal Teacher Recruitment Scam: Cooks, drivers, gardeners were directors of companies; Salary in thousands and assets in crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.