बंगाली युवकाचा गोव्यातील कोलवा समुद्रात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 21:16 IST2019-11-29T21:13:44+5:302019-11-29T21:16:08+5:30
अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.

बंगाली युवकाचा गोव्यातील कोलवा समुद्रात बुडून मृत्यू
मडगाव - मूळ पश्चिम बंगाल येथील एका इसमाचा गोव्यातील कोलवा समुद्रात बुडून एका इसमाला मृत्यू आला. विशालकुमार थापा (37) असे मयताचे नाव आहे. तो मूळ पश्चिम बंगाल राज्यातील न्यु जलपाईगुडी येथील रहिवाशी असून, कोलवा येथे तो कामाला होता अशी माहिती कोलवा पोलिसांनी दिली. मासेमारी करण्यासाठी तो अन्य एकासमवेत गेला होते. जाळे ओढताना त्याला फीटस आल्याने तोल जाउन तो पाण्यात पडला व बुडाला आज दुपारी ही घटना घडली. मागाहून त्याला पाण्याबाहेर काढून मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. मृतदेह गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या शवागारात ठेवला आहे. कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहूल नाईक पुढील तपास करीत आहेत.