सावधान! 'तो' एक मेसेज अन् बँक अकाऊंटमधून गेले 61 लाख; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 11:00 AM2023-12-05T11:00:23+5:302023-12-05T11:09:30+5:30

टेलिग्रामवर पार्ट टाईम नोकरीची ऑफर मिळाली. ऑफर पाठवणारी स्कॅमर एक महिला होती, जिने स्वतःची सुहासिनी अशी ओळख करून दिली.

bengaluru based man loses money of 61 lakh in cyber fraud | सावधान! 'तो' एक मेसेज अन् बँक अकाऊंटमधून गेले 61 लाख; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात

सावधान! 'तो' एक मेसेज अन् बँक अकाऊंटमधून गेले 61 लाख; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात

सायबर स्कॅमची रोज नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत, ज्यामध्ये स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. एका व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. त्याने सायबर फ्रॉडमध्ये तब्बल 61.58 लाख रुपये गमावले.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये राहणारे उदय उल्लास हे नेहमीच सोशल मीडिया एप्सच्या मदतीने काही चॅनेलद्वारे स्टॉक मार्केटचा ट्रेंड चेक करायचे. पण एके दिवशी त्यांना पार्ट टाइम जॉबबाबत मेसेज आला.

टेलिग्रामवर आला मेसेज 

टेलिग्रामवर पार्ट टाईम नोकरीची ऑफर मिळाली. ऑफर पाठवणारी स्कॅमर एक महिला होती, जिने स्वतःची सुहासिनी अशी ओळख करून दिली. पार्ट टाईम जॉबमध्ये व्यक्तीला एका वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले होते. मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती मिळाली आहे.

स्कॅमर्सनी आधी या व्यक्तीचा विश्वास संपादन केला आणि नंतर त्याला हाय रिटर्न देण्याचे आमिष दाखवलं आणि त्याला गुंतवणूक योजनेबद्दल देखील सांगितलं. सुरुवातीला 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून 20 लाखांपर्यंत कमाईचे आमिष दाखवण्यात आले.

जेव्हा व्यक्तीने 20 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा खरा खेळ सुरू झाला. स्कॅमर्सनी सांगितले की तुमचा क्रेडिट स्कोअर कमी आहे, त्यामुळे तुम्ही ती रक्कम काढू शकत नाहीत. यानंतर त्याच्याकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली. यानंतर त्याची एका VIP channel सोबत ओळख झाली.

व्यक्तीच्या बँक खात्यातून 61.5 लाख रुपये काढल्यानंतर सायबर फसवणुकीची माहिती मिळाली. यानंतर त्याने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कोणतेही पैशाचे व्यवहार करताना सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. 
 

Web Title: bengaluru based man loses money of 61 lakh in cyber fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.