'तुझ्या पत्नीला माझ्याजवळ पाठव..', मित्राचं हे बोलणं ऐकताच मारून मारून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 05:59 PM2023-03-13T17:59:51+5:302023-03-13T18:00:20+5:30

Crime News : मणिकांतच्या नाकातून रक्त वाहत होतं. त्यांनी मणिकांतला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांना सूचना दिली.

Bengaluru man killed his friend after he asked him to send his wife to him | 'तुझ्या पत्नीला माझ्याजवळ पाठव..', मित्राचं हे बोलणं ऐकताच मारून मारून केली हत्या

'तुझ्या पत्नीला माझ्याजवळ पाठव..', मित्राचं हे बोलणं ऐकताच मारून मारून केली हत्या

googlenewsNext

Crime News : कर्नाटकच्या बंगळुरूमधून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आपल्या मित्राची निर्दयीपणे हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मणिकांत नावाची व्यक्ती सुरेशच्या घरी दारू पिऊन आली. तिथे तो सुरेशला म्हणाला की, त्याने त्याची पत्नी त्याच्याकडे पाठवावी.

हे ऐकताच सुरेश संतापला. त्याने घरात ठेवलेली काढी घेतली आणि तिने  मणिकांतला मारून मारून त्याची हत्या केली. त्याने सांगितलं की, मणिकांत दारू पिऊन घरात पडलेला आहे. त्याला हे माहितच नव्हतं की, मणिकांतचा मृत्यू झालाय. त्यानंतर मणिकांतचे कुटुंबिय लगेच सुरेशच्या घरी पोहोचले.

मणिकांतच्या नाकातून रक्त वाहत होतं. त्यांनी मणिकांतला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांना सूचना दिली. मणिकांतचा पोस्टमार्टम करण्यात आलं तेव्हा समजलं की, त्याला डोक्याला मार लागला आहे. यावरून पोलिसांना संशय आला. त्यांनी सुरेशची कसून चौकशी केली.

सुरेशने लगेच आपला गुन्हा कबूल केला. सुरेशनने सांगितलं की, नशेच्या स्थितीत मणिकांत त्याच्या घरी आला होता आणि त्याच्या पत्नीबाबत वाईट बोलत होता. सुरेश म्हणाला की, 'आधी तर मी दुर्लक्ष केलं. पण जसा तो म्हणाला की, माझ्या पत्नीला त्याच्याकडे पाठवू तेव्हा मला राग आला. त्यानंतर मी त्याला मारलं'. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. सुरेशला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Bengaluru man killed his friend after he asked him to send his wife to him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.